महाराष्ट्राचे लाडके ‘भावोजी’ म्हणून महाराष्ट्रासह अवघ्या जगभरात लोकपिय असलेले अभिनेते म्हणजे आदेश बांदेकर. छोट्या पडदयावरील ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी ‘दार उघड बये दार उघड’ म्हणत प्रेक्षकांच्या मनात प्रवेश केला. त्यांच्या लाघवी बोलण्याने आणि मनमुराद संवाद साधण्याच्या शैलीने त्यांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. आदेश बांदेकरांनी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम करत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अशातच काल (१८ जानेवारी) रोजी त्यांचा ५८वा वाढदिवस झाला आणि यानिमत्त त्यांच्या लाडक्या लेकाने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छचा दिल्या आहेत. (Soham Bandekar On Instagram)
आदेश व सूचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. सोहम बांदेकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्याने वडील आदेश बांदेकरांना वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. सोहमने इन्स्टाग्रामवर वडील आदेश बांदेकर यांच्याबरोबरचा एक हटके फोटो पोस्ट करत असे म्हटले आहे की, “बाबा वाढदिवसाच्या शुभेच्छा, आपली जशी शूजची साइज् सेम (सारखी) आहे, तसं मला माझ्या मनाची साइज् तुझ्या मनाएवढी मोठी करण्याची इच्छा आहे आणि जर त्यात थोडी तरी वाढ झाली, तरी माझा २०२४ सत्कारणी लागला अस वाटेल.”
आणखी वाचा – “चित्रपटगृहातून रजा घेताना…”, ‘झिम्मा २’च्या कलाकारांची भावुक पोस्ट, म्हणाले “तुमचं प्रेम, आपुलकी…”
सोहमने शेअर केलेल्या या पोस्टला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. रश्मी अनपट, विशाल निकम या मराठी कलाकारांसह अनेक चाहत्यांनी कमेंट्सद्वारे आदेश बांदेकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा – ‘या’ दिवशी होणार ‘बिग बॉस १७’ चा अंतिम सोहळा, विजेत्याला मिळणार इतकी रोख रक्कम अन्…
दरम्यान, सोहम हा सिनेसृष्टीत चांगलाच कार्यरत आहे. सोहमने स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. ही त्याची पहिली मालिका होती. या मालिकेतील त्याच्या पोलिसाच्या भूमिकेचे कौतुक करण्यात आले.