‘बिग बॉस १७’ या लोककप्रिय शोचा प्रवास आता अंतिम भागाकडे चालला असू या शोने आतापर्यंत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. ‘बिग बॉस’च्या घरात राहिलेले सर्व स्पर्धक अंतिम भागात आपले स्थान टिकवण्यासाठी प्रत्येक टास्कमध्ये सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. या शोमध्ये सध्या अंकिता लोखंडे, विकी जैन, मुन्नवर फारुकी, आयेशा खान, ईशा मालवीय, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार व अरुण महाशेट्टी हे ८ स्पर्धक बाकी आहेत. या ८ स्पर्धकांमध्ये अंतिम फेरीत जाण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
येत्या २८ जानेवारी रोजी ‘बिग बॉस १७’चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे या शोला घेऊन प्रेक्षकांमध्ये व स्पर्धकांच्या चाहत्यांमध्ये खुपच उत्सुकता निर्माण झाली असल्याची पाहायला मिळत आहे. त्यामुळे या शोच्या विजेत्याला बक्षीस नेमका किती इनाम मिळणार? हे जाणून घेण्यासाठी चाहते खुपच आतुर आहेत. तर जाणून घेऊयात ‘बिग बॉस’च्या अंतिम सोहळ्यात स्पर्धकाला इनाम म्हणून नक्की मिळणार.
‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाच्या विजेत्याला ‘बिग बॉस’च्या आकर्षक ट्रॉफीसह बक्षीस म्हणून मोठी रक्कमदेखील मिळणार आहे. Siasat.com च्या वृत्तानुसार, या पर्वाच्या विजेत्याला तब्बल ३० ते ४० लाख रुपये मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. ‘बिग बॉस’च्या गेल्या पर्वाचा विजेता एम.सी. स्टेनने ३१.८ लाख रुपये मिळाले होते. त्यामुळे या शोच्या यंदाच्या पर्वाच्या विजेत्याला यापेक्षा अधिक रक्कम मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
३० ते ४० लाख रुपयापर्यंतची रोख रक्कम व आकर्षक ट्रॉफीसह विजेत्याला एक महागडी अलिशान कारदेखील बक्षीस स्वरूपात मिळणार आहे. त्यामुळे या आकर्षक ट्रॉफी, रोख रक्कम व अलिशान गाडीसाठी स्पर्धकांमध्ये जोरदार लढत सुरु आहे. त्यामुळे अंतिम सोहळ्यात जाण्यासाठी आगामी भागात कोणता स्पर्धक बाजी मारणार हे पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत हे नक्की…