सोमवार, मे 12, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बायकोच्या आठवणीत भावुक झालेल्या रोहित राऊतच्या पोस्टवर जुईलीची कमेंट, म्हणाली, “तुला त्रास देण्यासाठी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 19, 2024 | 11:14 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rohit Raut Emotional Post

बायकोच्या आठवणीत भावुक झालेल्या रोहित राऊतच्या पोस्टवर जुईलीची कमेंट, म्हणाली, "तुला त्रास देण्यासाठी…"

गायक रोहित राऊत व गायिका जुईली जोगळेकर यांनी २०२२ मध्ये त्यांचा लग्नसोहळा उरकला. अगदी शाही थाटामाटात रोहितच्या व जुईली यांचा विवाहसोहळा उरकला. त्यानंतर रोहित व जुईली दोघेही संसाराला लागले. सोशल मीडियावरही रोहित व जुईली नेहमीच सक्रिय असतात. नेहमीच काही ना काही शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. दोघांचे अनेक धमाल, कॉमेडी व्हिडीओ कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. (Rohit Raut Emotional Post)

रोहित व जुईली बऱ्याच कार्यक्रमांना एकत्र गायची मैफिल करताना दिसतात. दोघांनीही त्यांच्या गोड आवाजाने स्वतःचा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. शिवाय दोघेही सोशल मीडियावरुनही अनेकदा एकत्र गाणी गाताना दिसतात. रोहित व जुईली यांची अनोखी केमिस्ट्री कायमच प्रेक्षकांना भावते. सध्या जुईली तिच्या कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत काश्मीर येथे फिरायला गेली आहे. तेथे फिरतानाचे अनेक फोटो, व्हिडीओ ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत आहे.

आणखी वाचा – “आपल्या शूजची साईज…”, आदेश बांदेकरांना वाढदिवसानिमित्त लेकाने दिल्या खास शुभेच्छा, म्हणाला “माझ्या मनाची…”

View this post on Instagram

A post shared by Rohit Shyam Raut (@rohitshyamraut)

अशातच रोहितने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बायको घरी नसताना मस्ती-धमाल करु असा आपण विचार करतो पण सत्यात तसे घडत नाही असे म्हणत रोहितने एक पोस्ट शेअर केली आहे. या मध्ये बायको घरी नसताना कोणत्या समस्या येतात, कोणत्या भावना असतात अशा अनेक अडचणी त्याने लिहिलेल्या गाण्यातून मांडलेल्या पाहायला मिळत आहेत. या गाण्यासह त्याने “ठीक आहे, मला तुझी खूप आठवण येत आहे. आता घरी ये” असं कॅप्शन देत ही पोस्ट शेअर केली आहे. गाणं गाताना रोहितच्या डोळ्यात पाणी आलेलं ही पाहायला मिळालं.

आणखी वाचा – “फक्त अश्रू अनावर झाले अन्…”, नरेंद्र मोदींची आर्या आंबेकरसाठी कौतुकास्पद पोस्ट, गायिका भावुक, म्हणाली, “यापेक्षा मोठं…”

रोहितच्या या पोस्टवर जुईलीने कमेंट करत, “फक्त २ दिवस, मी घरी येणार आहे. मग मी पूर्णपणे तुझ्याबरोबर असेन. तुला त्रास देण्यासाठी तुझे लाड करण्यासाठी, तुझ्या आजूबाजूला राहण्यासाठी, तुझ्या मिठीत झोपण्यासाठी मी तुझ्याकडे असेन. तुला माहित आहे की मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तू गायलेलं हे गाणं मला फार आवडलं आहे” असं म्हटलं आहे. जुईलीच्या या कमेंटवर रोहितने प्रतिक्रिया देत, “माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे” असं म्हटलं आहे.

Tags: entertainmentjuilee jogalekarrohit rautrohit raut emotionalrohit raut wife
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Anushka sharma on virat kohli retirement
Entertainment

“तुझे अश्रू, तुझा संघर्ष कोणीच न पाहता…”, विराट कोहलीच्या निवृत्तीवर अनुष्का शर्माची पहिली प्रतिक्रिया, भावुक झाली अन्…

मे 12, 2025 | 4:50 pm
Martyr Surendra Moga Daughter
Social

वडिलांचा शेवटचा फोन, सुरक्षित आहे बोलले अन्…; शहीद सुरेंद्र मोगा यांच्या लेकीचा आक्रोश, म्हणाली, “बदला घेईन”

मे 12, 2025 | 4:23 pm
Rakesh Poojary Death
Entertainment

अवघ्या तिशीत सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, मित्राच्या मेहंदीमध्ये नाचला, मित्रांसह मस्करी केली अन्…

मे 12, 2025 | 4:05 pm
Vaama Ladhai Sanmanachi
Entertainment

मराठीत ‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपटाची चर्चा, स्त्रियांचा संघर्ष अधोरेखित करणारं कैलास खैर यांच्या आवाजातील गाणं प्रदर्शित

मे 12, 2025 | 3:39 pm
Next Post
Bigg boss 17 netizens slams to Vicky Jain for he hugged Aayesha Khan video viral on social media

Bigg Boss 17 : “अंकिता नवऱ्याला देव मानते अन्...”, विकी जैनने आयेशा खानला मिठी मारताच नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले “खरंच मूर्ख...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.