‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेले अभिनेते आदेश बांदेकर यांचा स्वतःचा असा चाहतावर्ग आहे. आदेश बांदेकर यांचं संपूर्ण कुटुंबही सिनेसृष्टीत कार्यरत आहे. बांदेकरांच्या पत्नी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनीही अनेक चित्रपट मालिकांमधून काम करत सिनेसृष्टीत स्वतःची अशी ओळख निर्माण केली. याशिवाय बांदेकरांचा लेक सोहम बांदेकरही अभिनयक्षेत्रात सक्रिय आहे. आई वडिलांपाठोपाठ सोहम बांदेकरचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे. (Soham Bandekar On Ask Me Anything)
सोहमने त्याचा मनोरंजन विश्वातील प्रवास हा मालिकेपासून सुरु केला. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेत सोहम झळकला होता. या मालिकेत पोलीस अधिकाऱ्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत तो दिसला होता. त्याचप्रमाणे सोहमने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.
सोहम हा सोशल मीडियावर ही बऱ्यापैकी सक्रीय असतो. सोहमचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. बरेचदा सोहम त्याच्या आगामी प्रकल्पाबद्दल माहिती शेअर करत असतो. अशातच सोशल मीडियावरून एका चाहत्याला सोहमने दिलेल्या उत्तराने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे सोहम सध्या चर्चेत आला आहे. नुकतंच सोहमने त्याच्या चाहत्यांसाठी ‘Ask me anything काहीच लपवणार नाही मी पक्का’ या सेशनचे आयोजन केले होते. यावेळी सोहमने त्याच्या चाहत्यांच्या सर्वच प्रश्नांना उत्तर दिली.

या सेगमेंटदरम्यान चाहत्याने विचारलेल्या एका प्रश्नावर सोहमने दिलेलं उत्तर साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या सेगमेंटमध्ये एका चाहत्याने सोहमला प्रश्न विचारला की, “कशी मुलगी हवी तुला बायको म्हणून?” यावर सोहमने दिलेलं उत्तर लक्ष वेधून घेत आहे. सोहमने चाहत्यांच्या या प्रश्नाला उत्तर देत म्हटलं की, “कशीही चालेल, आईला आवडली पाहिजे बस” असं गमतीत उत्तर दिलं आहे. सोहम याआधीही एका फॉरेनर मुलीबरोबरच्या व्हायरल फोटोवरून चर्चेत आला होता. त्यावेळी त्याने यावर स्पष्टीकरण देत हा एक चित्रपटातील सीन असल्याचं सांगितलं.