छोट्या पडद्यावरील ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय शोमधून अवघ्या महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणून आदेश बांदेकर नावारूपाला आले. अभिनेते आदेश बांदेकर. राजकारणातही आदेश बांदेकर हे विशेष सक्रिय आहेत. रंगभूमी, होम मिनिस्टर आणि याशिवाय राजकीय कार्यक्रम यानिमित्ताने आदेश यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी ते प्रवास करत असतात. यादरम्यान त्यांना येणारे अनुभव, किस्से, काही खास आठवणी ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच त्यांनी त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे.
आदेश बांदेकर हे वाईवरुन मुंबईला प्रवास करत असताना त्यानं रस्त्यात ट्रॅफिकमुळे थांबावं लागलं. वाईवरुण मुंबईला येत असताना खंबाटकी घाटात एक भलामोठा क्रेन बोगद्यामध्ये अडकला अन् त्यामुळे तब्बल १ तास त्यांना त्या बोगद्यामध्येच अडकून रहावं लागलं. त्याचबरोबर रस्त्यात एक अपघात झाल्यामुळेही त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा त्रास सहन करावा लागला. याचाच व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओच्याखाली कॅप्शनमध्ये वाई मुंबई प्रवास सुरू असताना खंबाटकी बोगद्यामधे १ तास अडकून राहणे हि वेळ कोणावरच येऊ नये. पुन्हा प्रवास सुरू” असं म्हणत पोलिस व क्रेन चालकांना धन्यवाद लिहिले आहे.
त्याचबरोबर या व्हिडीओमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, “हा भलामोठा कंटेनर बघा. हा कंटनेर खंबाटकी बोगद्यामध्ये अडकला आहे. त्यामुळे वाहतुक कोंडी झाली आहे. वाहतुक कोंडीमुळे प्रवाशांना अडचणी निर्माण होत आहेत. चालकाने कोणत्याही प्रकारचा विचार न करता बोगद्यापेक्षा मोठ्या आकाराचा कंटेनर घेऊन तो आला. त्यामुळे नाहक अडचणींचा सामना करावा लागला. असंख्य प्रवासी अडकून पडले. या प्रसंगामध्येही पोलिस दलाचे मनापासून आभार. पोलिस आणि त्याचबरोबर प्रवाशांनी तो कंटनेर बोगद्याबाहेर काढला. शिवाय क्रेन चालकाचेही आभार. कारण बोगद्याबाहेर समोरच आणखी एक कंटेनर रस्त्यावर पडलेला होता. हे असेच अपघात होत राहिले. अशा ठिकाणी जर वाहतुक कोंडी झाली आणि एखादी रुग्णवाहिका अडकली तर तुमच्या-आमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचा बळी जाऊ शकतो. देव चालकांना सुबुद्धी देवो”.
दरम्यान, आदेश बांदेकर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये या नाहक त्रासाबद्दल रोष व्यक्त केला आहे. “या अशा चालकांविरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांच्या या हलगर्जीपणामुळे प्रवाशांना उगाच नाहक त्रास सहन करावा लागतो.” अशा अनेक कमेंट्स करत लोकांनी या व्हिडीओवर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.