बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Shivani Surve And Ajinkya Nanaware Marriage : शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरेचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न, लेहंग्यामध्ये मंडपात एन्ट्री केली अन्…; सुंदर व्हिडीओ समोर

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 1, 2024 | 1:39 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Shivani Surve And Ajinkya Nanaware Marriage

शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे लग्न

Shivani Surve And Ajinkya Nanaware Marriage : छोट्या पडद्यावरील ‘देवयानी’ मालिकेतून नावारूपाला आलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सुर्वे. या मालिकेतून शिवानी अवघ्या घराघरात पोहोचली. तर ‘बिग बॉस मराठी’ या शोद्वारेदेखील तिला खूपच प्रसिद्धी मिळाली. अशातच अभिनेत्रीचा नुकताच साखरपुडा सोहळा संपन्न झाला. गेले काही दिवस शिवानी अभिनेता अजिंक्य ननावरेबरोबर रिलेशनमध्ये होती. काही काल एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर ही जोडी विवाहबंधनात अडकली आहे. त्यांच्या लग्नाचे काही खास फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अभिनेत्रीने तिच्या लग्नात खास लूक केला असल्याचे पाहायला मिळत आहे, शिवानीने तिच्या लग्नासाठी फिकट गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. या लेहेंग्यावर सुंदर नक्षीकामदेखील आहे. तर अजिंक्यने सफेद रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केला आहे. अन् डोक्यावर गुलाबी रंगाचा फेटादेखील परिधान केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अजिंक्य-शिवानी यांच्यावर अक्षता पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाण्यातील येउर हिल्स या ठिकाणी हा विवाहसोहळा पार पडला आहे. तसेच त्यांच्या या लग्नासाठी खास थाटमादेखील पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावरेचा थाटामाटात पार पडला साखरपुडा, लूक अन् खास डेकोरेशनने वेधलं लक्ष, फोटो व्हायरल

अजिंक्य-शिवानी यांच्या लग्नानिमित्त त्यांना शुभाशिर्वाद देण्यासाठी खास मित्रपरिवार, आत्पेष्ट व नातेवाईक मंडळींनी हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या हळदी समारंभालाही ‘बिग बॉस मराठी’मधील माधव देवचक्के, नेहा शितोळे, मेघा धाडे यांनी हजेरी लावली होती. अशातच त्यांच्या लग्नाचे खास फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून कलाकार मंडळींसह त्यांच्या अनेक चाहत्यांकडून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  

आणखी वाचा – मुहूर्त ठरला, मंडप सजला, पाहुणे मंडळीही जमली अन्…; ‘या’ ठिकाणी पार पडणार अजिंक्य-शिवानीचं लग्न, जय्यत तयारी सुरु

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘इट्स मज्जा’बरोबर साधलेल्या संवादात अजिंक्यने आम्ही लवकरच आमच्या लग्नाची तारीख जाहीर करू असे म्हटले होते. तेव्हापासूनच त्यांच्या चाहत्यांना दोघांच्या लग्नाची उत्सुकता लागली होती. अशातच ही जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. त्यामुळे या नवविवाहित दाम्पत्यावर सोशल मीडियाद्वारे चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Tags: shivani ajinkya marrigeshivani surveshivani surve and ajinkya nanawareshivani surve and ajinkya nanaware marriageshivani surve and ajinkya nanaware marriedshivani surve and ajinkya nanaware weddingshivani surve boyfriendअजिंक्य ननावरेशिवानी सुर्वेशिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे लग्न
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Next Post
Shivani Surve and Ajinkya Nanaware Wedding Updates in Marathi

Video : शिवानी सुर्वेच्या संस्कारांचं कौतुक, ज्येष्ठ मराठी अभिनेत्री येताच नवऱ्यासह मंडपातच पाया पडली अन्…; कृतीने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.