बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचे पती व ‘आम आदमी पार्टी’चे राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी लंडनमध्ये असल्याचे वृत्त हाती आले आहे. सर्वच ठिकाणी याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असलेली पाहायला मिळत आहे.नुकतीच परिणीती सध्या तिच्या ‘चमकीला’ या चित्रपटामध्ये दिसून आली होती. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने ती माध्यमांबरोबरदेखील संवाद साधताना दिसली होती. मात्र राघव बरेच दिवस कुठेही दिसून आले नव्हते. अरविंद केजरिवाल यांच्या अटकेनंतर देखील राघव माध्यमांमध्ये दिसून आले नव्हते त्यामुळे ते अचानक या दरम्यान कुठे गायब झाले असे प्रश्नदेखील उपस्थित राहिले होते. याबद्दल आता दिल्ली सरकार मंत्री सौरभ भारद्वाज यांनी याबद्दल खुलासा केला आहे. (raghav chadha eye surgery)
अरविंद केजरिवाल यांच्यावर इडीने कारवाई केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आलीहोती. यादरम्यान राघव कुठेही उपस्थित नव्हते. अशातच त्यांच्याबद्दल सौरभ यांनी खुलासा करत सांगितले की , “राघव त्यांच्याअ डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी ब्रिटन येथे गेले आहेत. जर इतक्यात शस्त्रक्रिया झाली नसती तर त्यांना काहीही दिसू शकले नसते”.
पुढे ते म्हणाले की, “राघव यांच्या डोळ्यांची समस्या खूप अधिक होती. जर त्यांनी उशीर केला असता तर त्यांना दिसण्यामध्ये समस्या आल्या असत्या. माझ्या शुभेच्छा नेहमी त्यांच्याबरोबर आहेत. ते लवकरच आमच्यामध्ये सहभागी होतील अशी आशा आहे”.
दरम्यान लवकरच ते बारे होऊन भारतात दाखल होतील असे देखील सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी ते एका विवादामध्ये देखील अडकले होते. सोशल मीडियावरुण खलिस्तन चळवळ करणाऱ्या व भारताविरोधी भावना भडकावणाऱ्या ब्रिटिश लेबर सदस्य प्रीत गिलला भेटले होते. यावरुन राजकीय पटलावर मोठी घडामोडी दिसून आली होती. त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशा अफवा देखील सुरू झाल्या होत्या. ते ब्रिटन येथे पत्नी परिणीती बरोबर गेले होते. मात्र काही दिसवाटक परिणिती एकटी भारतात परतली होती तर राघव हे उपचारासाठी तिथेच राहिले होते.