मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पोरीनं मन जिंकलं! पूजा सावंतच्या ऑस्ट्रेलियाच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, म्हणाली, “खूप इच्छा होती की…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 1, 2024 | 2:07 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
pooja sawant on maharashtra day

पोरीनं मन जिंकलं! पूजा सावंतच्या ऑस्ट्रेलियाच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, म्हणाली, “खूप इच्छा होती की...”

मराठीमधील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत फेब्रुवारी महिन्यात लग्नबंधनात अडकली. ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या सिद्धेश चव्हाणबरोबर तिने लग्न केले आणि त्यानंतर लगेचच टी नवऱ्याबरोबर ऑस्ट्रेलियाला रवाना झाली. तिकडे जाऊनदेखील तेथील घराचे, तिचे व सिद्धेशचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मिडियावर पोस्ट करत असते. तसेच ती चाहत्यांच्या संपर्कातदेखील असते. लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवाही तिथे ऑस्ट्रेलियातील घरात अगदी मराठमोळ्या पद्धतीने गुढी उभारून साजरा केला होता. त्याचे फोटोदेखील तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले होते. तिच्या सर्व फोटोना चाहत्यांची खूप पसंती मिळाली होती. अशातच तिने आता ‘महाराष्ट्र दिना’बद्दलदेखील एक सुंदर पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.(pooja sawant on maharashtra day )

आज १ मे म्हणजे महाराष्ट्र दिन. सर्वच ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अशातच पूजाने तिच्या ऑस्ट्रेलियातील घरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीबरोरचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने सुंदर असे कॅप्शनदेखील दिले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “सर्वांना महाराष्ट्रदिनाच्या लाख लाख शुभेच्छा. माझी खूप इच्छा होती की मुंबईत असलेल्या घराप्रमाणेच माझ्या ॲास्ट्रेलियाच्या घरात देखील छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिमा असावी”.

आणखी वाचा – Video : नणंदेबरोबर ऐश्वर्या रायचं वैर, पण त्याचा राग अभिनेत्रीने भाचीवर काढला अन्…; ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बिचारी मुलगी…”

View this post on Instagram

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

पुढे तिने लिहिले की, “लग्नापूर्वी ही इच्छा मी माझ्या टिमला अगदी सहजपणे बोलून दाखवली होती. त्यातील मनोजने ( आमचे spot दादा ) ही प्रतिमा मला आमच्या लग्नात भेट म्हणून दिली.  त्यानंतर अगदी काळजीपूर्वक मी महाराजांची ही प्रतिमा ऑस्ट्रेलियाला घेऊन आले.फायनली आता छत्रपती शिवाजी महाराज आमच्या ॲासट्रेलियाच्या घरात सुद्धा विराजमान झाले आहेत. खुप खुप धन्यवाद मनोज”.

आणखी वाचा – परिणीती चोप्राचे पती राघव चढ्ढांचा गंभीर आजाराशी सामना, शस्त्रक्रियेसाठी परदेशात दाखल, नेमकं झालं तरी काय?

पूजाच्या या पोस्टला अनेक चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. तसेच अनेक प्रतिक्रिया देत पूजाचे कौतुकदेखील केले आहे. एका चाहत्याने म्हंटले आहे की, “जगाच्या पटलावर कुठेही गेलो तरीही आपण आपली संस्कृती विसरायची नाही त्याचे हे एक उत्तम उदाहरण”, “तसेच एकाने लिहिले आहे की, “महाराष्ट्र संस्कृती खूप छान जपली आहे”.

दरम्यान पूजा लग्नानंतर लगेचच ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाली होती. तिच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ‘मुसाफीर’ या चित्रपटामध्ये शेवटची दिसून आली होती.  

Tags: maharashtra daymarathi mulgipooja sawant
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
gayatri datar new serial

‘तुला पाहते रे’नंतर गायत्री दातारच्या नव्या मालिकेची घोषणा, प्रोमो समोर, प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.