कलाकार मंडळींसह या कलाकारांच्या मुलांचीही विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळत असते. कलाकारांच्या चाहत्यांना त्यांच्या मुलांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता नेहमीच लागून राहिलेली असते. या कलाकारांच्या स्टारकिडमध्ये अभिनेत्री करीना कपूर व सैफ अली खान यांची मुलं नेहमीच चर्चेत असतात.तैमूर अली खान व जेह ही करीनाची दोन्ही मुलं पापाराझींमध्ये खूप लोकप्रिय आहेत. तैमूर व जेहचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर लोकप्रिय असतात. (Kareena Kapoor Son)
अलीकडेच करीना कपूर खान व तिचा लहान मुलगा जेह यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जेह रागावलेला दिसत आहे. करीना कपूर खानचा मोठा मुलगा तैमूर खूप शांत आहे आणि चाहते त्याच्या क्यूटनेसचेही वेडे आहेत. मात्र अलीकडे लोकांना करीनाच्या धाकट्या मुलाचा म्हणजेच जेहचा राग पाहायला मिळाला. रागाच्या भरात जेहने असे काही केले की, त्याची आई करीना कपूरही पाहतच राहिली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे.
करीना कपूर खान नुकतीच तिचे वडील रणधीर कपूर यांना भेटण्यासाठी आली होती. त्यावेळी तिची दोन्ही मुले तैमूर व जेह देखील अभिनेत्रीबरोबर दिसले. त्यांच्याबरोबर मुलांची नानीही तिथे होती. यावेळचा त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओवर लोक जोरदार कमेंट करत आहेत. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, करीना कपूरचा धाकटा मुलगा जेह गाडीतून खाली उतरताच त्याने रागाने रुमाल खाली फेकून दिला. आपल्या मुलाचे असे कृत्य पाहून करीनालाही राग येतो आणि ती जेहकडे पाहत राहते. मात्र, नानी पुढे जाऊन रुमाल उचलते. आणि त्यानंतर सगळे आत जातात.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक करीना कपूर व तिच्या मुलाबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करताना दिसत आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की करीनाने आपल्या मुलांना शिष्टाचार शिकवण्याची गरज आहे. तथापि, करीनाच्या चाहत्यांनी जेहची बाजू घेत असे म्हटले आहे की, ‘तो लहान मुलगा आहे’.