मालिका हा तर प्रेक्षकांच्या रोज च्या रुटीन मधला भागच झालाय. त्या त्या वेळेला हातात आपसूकच रिमोट येतो आणि संध्याकाळी ७ ते ११ चा दिनक्रम ठरलेला असतो. आणि या मालिकेतील पात्र प्रेक्षकांना त्यांच्या कुटुंबातला एक भागच वाटतात. आणि त्या जोडयांना प्रेक्षक भरभरून प्रेम देतात. त्यांच्या नात्यातलं प्रत्येक वळण हे महत्वाचं ठरत. प्रत्येक मालिकेतील कुटुंब त्यातील नाती ही प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतात. त्यामुळे मालिकांचं कथानक, कलाकार सगळेच प्रेक्षकांचा हा विश्वास सार्थ ठरवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतात.(Shetakari Navra Pahije)
पहा मालिकेत कोणाची होणार आहे एन्ट्री (Shetakari Navra Pahije)
अशाच मालिकांन पैकी कलर्स मराठी वरील शेतकरीच नवरा हवा ही मालिका गेल्या चार महिन्यानं पासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. आणि कमीच वेळात या मालिकेने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. या मालिकेतील सयाजी आणि रेवा च्या जोडीला प्रेक्षकांनी आपलस केलं आहे.शेतकरी हा शब्दच आपलासा वाटणारा आहे. शेतकऱ्याची सद्य परिसथिती आपण सारेच जाणतो. आता कोणतीही मुलगी आपल्याला शेतकरी मुलगा हवा असे म्हणताना दिसून येत नाही.
अगदी शेतकरी वडील ही आपल्या मुलीचं लग्न शेतकरी मुलाशी करून देत नाहीत. म्हणूनच मालिकेच्या नावापासूनच मालिकेने आपलं वेगळंपण जपलं आहे. एका बाजूला उच्चभ्रू घरातील, सुशिक्षित,कॉर्पोरेट जगातील रेवा, आणि दुसऱ्या बाजूला शेतीच शिक्षण घेतलेला, सुशिक्षत शेतकरी म्हणजे सयाजी ज्याला आपल्या आजोबांना दिलेलं स्वप्न पूर्ण करायचंय आणि शेतीला सोन्याचे दिवस दाखवायचे आहेत. अशा दोन भिन्न परिस्थिती असताना ही रेवाला शेतकरी नवरा का हवाय हे हळू हळू मालीकेत पाहायला मिळतंय.(Shetakari Navra Pahije)
हे देखील वाचा – मनसेच्या गाण्यावर प्राजक्ताने धरला ठेका व्हिडीओ व्हायरल
रेवा आणि सयाजीची लव्ह स्टोरी कशी सुरु होणार, कशी फुलणार, कोणत्या अडथळ्यांना त्यांना सामोरं जावं लागेल याची उत्सुकता कायमच असते. सध्या मालिकेचं कथानक एका वेगळ्या वळणावर आहे. रेवा लवकरच सयाजीवरच्या प्रेमाची कबुली देणार आहे. परंतु इथेच आहे नवा ट्विस्ट रेवा आणि सयाजी मध्ये होणार आहे तिसऱ्याची एन्ट्री आणि हे पात्र येऊ कशी तशी मी नांदायला फेम अभिनेता शाल्व किंजवडेकर साकारणार असल्याचं समोर आलं आहे. आता रेवा आणि सयाजी ची लव्ह स्टोरी काय वळण घेते हे बघणं तसेच, रेवा सयाजीला तिच्या मनातलं सांगू शकेल का ? आणि शाल्वच हे पात्र कसं असेल, काय धुमाकूळ मालीकेत होईल हे पाहणं खरंच रंजक ठरणार आहे.