शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अखेर ‘तो’ क्षण आला, सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटाच्या कामाला सुरुवात, मुहूर्त सोहळा संपन्न

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 25, 2024 | 2:49 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
bigg boss fame suraj chavhan movie

सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न

यावर्षीचे ‘बिग बॉस’चे पाचवे पर्व अधिक चर्चेत राहिले आहे. या वर्षी ‘बिग बॉस’च्या विजेतेपदावर सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणने नाव कोरलं आहे. विजेतेपद जिंकल्यानंतर सूरजचे विविध स्तरातून कौतुक करण्यात आले. त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफरदेखील मिळाल्या. तसेच त्याचा मोठा चाहतावर्गदेखील तयार झाला. त्याचवेळी मराठी चित्रपट, मालिका दिग्दर्शक व ‘कलर्स मराठी’ वाहिनीचे सर्वेसर्वा केदार शिंदे यांनी केलेल्या एका घोषणेने सगळ्यांचेच लक्ष वेधले होते. केदार यांनी केलेल्या घोषणेमुळे सर्वच स्तरात त्यांचे कौतुक होताना बघायला मिळाले तसेच अनेक जण खूप भावुक झालेलेदेखील बघायला मिळाले. (bigg boss fame suraj chavhan movie)

‘बिग बॉस’मध्ये सूरजला जेव्हा पाहिले तेव्हा अनेकांनी विरोध दर्शवला. त्याला नीट खेळता येत नाही असेही बोलले गेले. मात्र दिवस जसे पुढे गेले तसा त्याचा खेळ सुधारत गेला. त्याला संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने पाठिंबा दिला. विजेतेपद पटकावल्यानंतर केदार यांनी सूरजबरोबर चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती. या चित्रपटांचे नाव ‘झापुक झुपुक’ असे चित्रपटाचे नाव असल्याची घोषणादेखील करण्यात आली होती. त्यामुळे हा चित्रपट कधी येणार? ही उत्सुकता सूरजच्या चाहत्यांना लागली होती.

आणखी वाचा – “खूप लोकांना गमावलं…”, सरत्या वर्षाला निरोप देताना ‘पारू’ फेम अहिल्यादेवी भावुक, सांगितला अनुभव

View this post on Instagram

A post shared by Deepa Pansarre (@deepalipansareofficial)

अशातच आता या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला आहे. याबद्दलची पोस्ट अभिनेत्री दीपाली पानसरेने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. दीपालीने मुहुर्ताचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये सूरज चव्हाण, केदार शिंदे, पुष्कराज चिरपुटकर, पायल जाधव असे कलाकार दिसून येत आहेत. तसेच दीपालीने ‘झापुक झुपूक’ व ‘मुहूर्त’ लिहिलेली क्लॅपदेखील शेअर केली आहे.

आणखी वाचा – ना अवाढव्य खर्च, ना महागडे कपडे, ‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीला लागली हळद, साधेपणाची चर्चा

दीपालीने फोटो शेअर करत लिहिले की, “मॅनिफेस्ट मॅजिक, एक सुंदर असा क्षण. खूप दिवसांपासून केदार शिंदे यांच्याबरोबर काम करण्याची वाट बघत होतो. आता संधी मिळाली.खूप खूप धन्यवाद केदार शिंदे व बेला शिंदे. ‘झापुक झुपूक’ टीमला खूप साऱ्या शुभेच्छा”. दरम्यान दीपालीच्या या पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. त्यामुळे आता सूरजचे चाहते त्याच्या  नवीन चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.

Tags: kedar shindemarathi movieSuraj Chavanzapuk zupuk movie
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Radhika Apte, Khushboo Tawde, Kartiki Gaikwad became mothers and actors Sanjay Patil and Nikhil Raut became father In the year 2024

यंदाचं वर्ष या कलाकरांसाठी ठरलं लकी, घरी नव्या पाहुण्याचं आगमन, काहींनी लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर केलं बाळाचं प्लॅनिंग

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.