यंदाचे वर्ष हे मराठी कलाकारांसाठी खऱ्या अर्थाने आनंदाचे गेले. या वर्षात कुणी नवं घर घेतलं. तर कुणी नवीन गाडी, कुणी आपल्या जोडीदराबरोबर लग्नगाठ बांधली तर कुणाच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन झाले. त्यामुळे २०२४ ही वर्ष कलाकारांसाठी खऱ्या अर्थाने आनंदाचे व सुख-समाधानाचे होते. यंदाच्या वर्षात कोणत्या कलाकारांनी नव्या पाहुण्याचे आगमन केले. चला जाणून घेऊ… (marathi artist became mother and father in 2024)
खुशबू तावडे : मराठी सिनेइंडस्ट्रीतलं लोकप्रिय जोडपे संग्राम साळवी आणि खुशबू तावडे यांना काही महिन्यांपूर्वी कन्यारत्न झालं. अभिनेत्री खुशबू तावडे दुसऱ्यांदा आई झाली असून तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला. २ ऑक्टोबर रोजी खुशबूची सहअभिनेत्री वैशाली भोसलेने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे खुशबूला मुलगी झाल्याची गुडन्यूज शेअर केली होती. खुशबूने आपल्या लाडक्या लेकीचे नाव ‘राधी’ असं ठेवलं आहे.
कार्तिकी गायकवाड : झी मराठी वहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या कार्यक्रमातून अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झालेली गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड. लग्नानंतर चार वर्षांनी कार्तिकीने या वर्षी मे महिन्यात एका गोंडस बाळाला जन्म दिला. “Its Baby Boy! गोंडस बाळाच्या आगमानाने मी खूपच आनंदी आहे” अशी पोस्ट लिहीत तिने आई झाल्याची बातमी आपल्या चहात्यांबरोबर शेअर केली होती.
राधिका आपटे : मराठीसह, साऊथ आणि बॉलिवूड क्षेत्रात आपलं नाव गाजवणारी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये १६ ऑक्टोबर रोजी ‘सिस्टर मिडनाइट’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला तिने आपला बेबी बंप दाखवत सगळ्या चाहत्यांना गुडन्यूजबद्दल सांगितलं होतं. त्यानंतर नुकतंच तिने स्तनपान करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. लग्नाच्या १२ वर्षानंतर तिने ही खुशखबर शेअर केली.
संजय पाटील : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम मालिकेत उदयची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता संजय पाटीलच्या घरी यंदा नवा पाहुणा आला. मार्च महिन्यात संजयला मुलगी झाली. “आमच्या आयुष्यात साजिरी गोजिरी परी आली. Its a Baby Girl” असं कॅप्शन देत संजयने छोट्या लेकीच्या जन्माबद्दल आनंदाची पोस्ट शेअर केली होती. त्याच्या या खुशखबरनंतर मालिकाविश्वातील अनेक कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या.
निखिल राऊत : झी मराठी’ वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या निखिल राऊतनेही यंदा बाबा झाल्याची खुशखबर दिली. २७ मे २०२४ रोजी निखिलच्या पत्नीने गोंडस मुलाला जन्म दिला. बाळाची पोस्ट शेअर करताना अभिनेत्याने डॉक्टर, नर्स व त्याच्या चाहत्यांना धन्यवाद म्हटलं होतं.