शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अल्लू अर्जुनच्या अडचणी थांबता थांबेना, चित्रपटात ‘तो’ सीन करणं भोवलं, काँग्रेस नेत्याकडून तक्रार दाखल

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 24, 2024 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Allu Arjun Pushpa 2 movie urinating in a swimming pool scene Congress leader filed a complaint against actor and director

‘पुष्पा-२’मध्ये अल्लू अर्जुनला 'तो' सीन करणं भोवलं, कॉँग्रेस नेत्याकडून तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?

सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा २ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळपास १५ हून अधिक दिवस उलटून गेले आहेत. मात्र हा चित्रपट तरीही चर्चेत आहे. एकीकडे ‘पुष्पा’ बॉक्स ऑफीसवर कोटींच्या कोटी उड्डाणे घेत आहे. तर दुसरीकडे प्रीमियर झालेल्या महिलेच्या मृत्यू आणि जखमी झालेल्या लहान मुलाप्रकरणाला अजूनही पूर्ण विराम लागलेला नाही. या प्रकरणी काहीजण अल्लू अर्जुनला पाठिंबा देत आहेत, या सगळ्यात त्याची काही चूक नसल्याचे म्हणत आहेत. अशातच रविवारी त्याच्या घरावर हल्ला झाल्याची बातमी आली. (Congress leader filed a complaint against Allu Arjun)

त्यानंतर आता या अल्लू अर्जुनबद्दल आणखी एक बातमी समोर येत आहे ती म्हणजे पुष्पा चित्रपटातील एका सीनवर काँग्रेस नेत्याने तक्रार दाखल केली आहे. चित्रपटातील एका दृश्याबाबत अल्लू अर्जुन आणि ‘पुष्पा 2 : द रुल’चे निर्माता आणि दिग्दर्शक यांच्याविरोधात पुन्हा तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेस नेते आणि तेलंगणाचे आमदार थेनमार मल्लान्ना यांनी तक्रार दाखल करून दिग्दर्शक सुकुमार आणि अभिनेता अल्लू अर्जुन तसेच प्रॉडक्शन टीमवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

आणखी वाचा – प्रसिद्ध गायक शान यांच्या इमारतीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी, नेमकं काय झालं?

थंमार मल्लाना यांनी आपल्या तक्रारीत ‘पुष्पा 2’ मधील एका दृश्यावर आक्षेप घेतला आहे, ज्यामध्ये ‘पुष्पा’ एका पोलिस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत स्विमिंग पूलमध्ये लघवी करताना दाखवली आहे. काँग्रेस नेत्याने हे दृश्य अपमानास्पद आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेचा अपमान करणारे म्हटले आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार आणि मुख्य भूमिका असलेला अभिनेता अल्लू अर्जुन तसेच चित्रपटाच्या निर्मात्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

आणखी वाचा – प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन, वयाच्या ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीवर शोककळा

काँग्रेस नेत्याने पोलिसांच्या पात्रांचे आक्षेपार्ह चित्रीकरण थांबवण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे एकीकडे अल्लू अर्जुनचा पुष्पा कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडत आहे तर दुसरीकडे त्याच्यावर अनेकानेक तक्रार दाखल होत आहेत. दरम्यान, ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत गंभीर जखमी झालेल्या त्या महिलेचा ८ वर्षांचा मुलगा अजूनही कोमात असल्याचे सांगण्यात येत आहे.

Tags: Allu Arjun Pushpa 2 movie urinating in a swimming pool sceneCongress leader filed a complaint against Allu Arjunpushpa 2
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Premachi Goshta serial fame Actor Rajas Sule and Chaitrali Pitale are married photos viral on social media

'प्रेमाची गोष्ट' फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला विवाहबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.