प्रसिद्ध बॉलिवूड गायक शानबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे प्रसिद्ध गायक शान हे ज्या इमारतीत राहतात, त्या इमारतीत मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेकांची सुखरुप सुटका करत त्यांना इमारतीबाहेर काढलं. मात्र एका वृद्ध महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिला अँब्युलन्समध्ये ठेवून भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Shaan building caught in fire)
मुंबईतील वांद्रे येथील फॉर्च्यून एन्क्लेव्ह नावाच्या रहिवासी इमारतीमध्ये मंगळवारी मध्यरात्री आग लागली. इमारतीच्या सातव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये ही लागली. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवत ती विझवली. बीएमसी फायर डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार, इमर्जन्सी नंबरवर कॉल आल्यावर त्यांना या आगीची सूचना मिळाली.
#WATCH | Mumbai, Maharashtra: Fire broke out in singer Shaan's residential building. Fire tenders on the spot. Further details awaited. pic.twitter.com/qWsmCggrf8
— ANI (@ANI) December 23, 2024
त्यानंतर फायर ब्रिगेडच्या १० गाड्या आणि जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करत रहिवाशांना बाहेर काढून बिल्डींग पूर्णपणे रिकामी केली. याच इमारतीच्या ११ व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक शान हे राहतात. आगीची ही घटना घडली तेव्हा शान आणि त्यांचे कुटुंबीय हे घरातच होते. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही वा वित्तहानीदेखील झाली नाही.
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. काही तासांनंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. यावेळी इमारतीत राहणाऱ्या सर्व लोकांना बाहेर काढण्यात आलं होतं. गायक शानही कुटुंबासह इमारतीबाहेर उभा होता.