मराठी कलाविश्वात सध्या सर्वत्र लग्नसराई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहेत, काही दिवसांपूर्वी रेश्मा शिंदे, किरण गायकवाड आणि शाल्व किंजवडेकर या कलाकारांनी आपल्या जोडीदराबरोबर लग्नगाठ बांधली. अशातच आणखी एक अभिनेता लग्नबंधनात अडकला आहे. आणि हा अभिनेता म्हणजे राजस सुळे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मिहीर म्हणजे अभिनेता राजस सुळेने लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. गेल्या नऊ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या चैत्राली पितळेशी राजसने नुकतंच लग्न केलं आहे. (Rajas Sule and Chaitrali Pitale Married)
राजस सुळे आणि चैत्राली पितळेचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं. लग्नात राजसने राजेशाही पेहराव केला होता. ऑफ व्हाइट रंगाचा आउटफिट घातला होता; ज्यावर सोनेरी रंगाचा फेटा घातला होता. तसंच चैत्रालीने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. राजस आणि चैत्राली राजेशाही लूकमध्ये खूप सुंदर दिसत होते. अभिनेत्याने काहीच दिवसांपूर्वी त्यांच्या प्रीवेडिंग फोटोशूटची झलक शेअर केली होती. आता चैत्राली आणि राजस यांच्या लग्नाचेही फोटो समोर आले आहे.
आणखी वाचा – अल्लू अर्जुनच्या अडचणी थांबता थांबेना, चित्रपटात ‘तो’ सीन करणं भोवलं, काँग्रेस नेत्याकडून तक्रार दाखल
राजस-चैत्राली यांच्या मित्र परिवाराने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नातील फोटो शेअर करत खास शुभेच्छाही दिल्या आहेत. तसेच चाहत्यांनीही त्यांच्या मिहिरला शुभेच्छा देणाऱ्या कमेंट केल्यात. मराठी मालिकाविश्वातील अनेक कलाकार मंडळींनी राजस आणि चैत्रालीच्या लग्नाला खास हजेरी लावली होती. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सागर आणि मुक्ता यांचा विवाह सोहळा पार पडला होता. त्यावेळी मिहिरने त्याच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमाची कबुली दिली होती.
आणखी वाचा – अधिपती अक्षरामधील गैरसमज अधिक वाढणार, भुवनेश्वरी ठरणार कारण, नवीन ट्विस्टवर प्रेक्षकही नाराज
दरम्यान, राजस सुळेच्या कामाबद्दल बोलायचं झालं, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला आहे. त्याने साकारलेली मिहीरची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या आधी अभिनेता ‘हर हर महादेव’ चित्रपटात झळकला होता.