सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा २ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळपास १५ हून अधिक दिवस उलटून गेले आहेत. मात्र हा चित्रपट तरीही चर्चेत आहे. एकीकडे ‘पुष्पा’ बॉक्स ऑफीसवर कोटींच्या कोटी उड्डाणे घेत आहे. तर दुसरीकडे प्रीमियर झालेल्या महिलेच्या मृत्यू आणि जखमी झालेल्या लहान मुलाप्रकरणाला अजूनही पूर्ण विराम लागलेला नाही. या प्रकरणी काहीजण अल्लू अर्जुनला पाठिंबा देत आहेत, या सगळ्यात त्याची काही चूक नसल्याचे म्हणत आहेत. अशातच रविवारी त्याच्या घरावर हल्ला झाल्याची बातमी आली. (Congress leader filed a complaint against Allu Arjun)
त्यानंतर आता या अल्लू अर्जुनबद्दल आणखी एक बातमी समोर येत आहे ती म्हणजे पुष्पा चित्रपटातील एका सीनवर काँग्रेस नेत्याने तक्रार दाखल केली आहे. चित्रपटातील एका दृश्याबाबत अल्लू अर्जुन आणि ‘पुष्पा 2 : द रुल’चे निर्माता आणि दिग्दर्शक यांच्याविरोधात पुन्हा तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेस नेते आणि तेलंगणाचे आमदार थेनमार मल्लान्ना यांनी तक्रार दाखल करून दिग्दर्शक सुकुमार आणि अभिनेता अल्लू अर्जुन तसेच प्रॉडक्शन टीमवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आणखी वाचा – प्रसिद्ध गायक शान यांच्या इमारतीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी, नेमकं काय झालं?
थंमार मल्लाना यांनी आपल्या तक्रारीत ‘पुष्पा 2’ मधील एका दृश्यावर आक्षेप घेतला आहे, ज्यामध्ये ‘पुष्पा’ एका पोलिस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत स्विमिंग पूलमध्ये लघवी करताना दाखवली आहे. काँग्रेस नेत्याने हे दृश्य अपमानास्पद आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेचा अपमान करणारे म्हटले आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार आणि मुख्य भूमिका असलेला अभिनेता अल्लू अर्जुन तसेच चित्रपटाच्या निर्मात्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
काँग्रेस नेत्याने पोलिसांच्या पात्रांचे आक्षेपार्ह चित्रीकरण थांबवण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे एकीकडे अल्लू अर्जुनचा पुष्पा कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडत आहे तर दुसरीकडे त्याच्यावर अनेकानेक तक्रार दाखल होत आहेत. दरम्यान, ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत गंभीर जखमी झालेल्या त्या महिलेचा ८ वर्षांचा मुलगा अजूनही कोमात असल्याचे सांगण्यात येत आहे.