हिंदी सिनेविश्वाला मोठा धक्का बसला आहे. तो म्हणजे प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले बेनेगल यांच्यावर मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरू होते. वोक्हार्ट रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. स्वत: बेनेगल यांनीही काही दिवसांपूर्वी आपल्या आजारपणाबाबत माहिती देताना नियमितपणे ‘डियलिसिस’ करून घ्यावे असल्याचे सांगितले होते. (Shyam Benegal passed away)
बेनेगल गेल्या काही वर्षांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. मात्र गेल्या काही दिवसांत त्यांचा आजार बळावला आणि वोक्हार्ट रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी संध्याकाळी ६.३८ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालविल्याचे पिया बेनेगल यांनी सांगितले. ते ९० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले बेनेगल यांच्यावर मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरू होते.
त्यांच्या पश्चात पत्नी निरा आणि मुलगी पिया असा परिवार आहे. बेनेगल यांच्या निधनामुळे कलाक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची मुलगी पिया बेनेगल म्हणाली, ‘ते दीर्घकाळापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते.’ दोन वर्षांपूर्वी त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. तेव्हापासून त्यांच्यावर डायलिसिसवर उपचार सुरू होते.
आणखी वाचा – Video : कोकणातल्या गावी रमल्या ऐश्वर्या नारकर, चुलीवर काम करण्याचा अभिनेत्रीचा आनंद, साधेपणाचं कौतुक
बेनेगल यांचा जन्म १४ डिसेंबर १९३४ रोजी हैदराबाद येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनी अर्थशास्त्रात शिक्षण घेतले. नंतर फोटोग्राफी सुरू केली. त्यांना बॉलीवूडमधील आर्ट सिनेमाचे जनक देखील मानले जाते. ते बारा वर्षांचे असताना त्यांनी त्यांचे फोटोग्राफर वडील श्रीधर बी यांच्यासोबत काम केले. बेनेगल यांनी दिलेल्या कॅमेऱ्यावर पहिला चित्रपट बनवला.
अंकूर, निशांत, मंडी, मंथन यासारखे गंभीर विषय असोत की वेलकम टू सज्जनपूर, वेल डन अब्बा असे हलकेफुलके कथानक… दोन्हीही तितक्याच समर्थपणे हाताळताना समांतर चित्रपट मुख्य प्रवाहातही लोकप्रिय करणारे प्रयोगशील दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या अचानक निघून जाण्याने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अकस्मित निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे