शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“घरी दुर्देवी घटना घडली पण…”, आईच्या निधनानंतर पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर व्यक्त झाल्या मृणाल कुलकर्णी, म्हणाल्या, “थांबायचं नाही कारण…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 12, 2024 | 9:59 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Actress Mrunal Kulkarni expressed her feelings for the first time on the demise of her mother.

आईच्या निधनानंतर आईबद्दल पहिल्यांदाच व्यक्त झाल्या मृणाल कुलकर्णी, प्रतिक्रिया देताना अश्रू अनावर

सुप्रसिद्ध लेखिका, समीक्षक तसेच अभिजात साहित्य लीलया हाताळणाऱ्या डॉ. वीणा देव यांचं मंगळवार, २९ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झालं. त्या लोकप्रिय मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या आई, तर लेखक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत्या. वीणा देव पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. याठिकाणी त्यांनी ३२ वर्षे अध्यापनाचं कार्य केलं. आपल्या आईच्या निधनानंतर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी दु:ख व्यक्त करत भावुक पोस्ट शेअर केली होती. सोशल मीडियाद्वारे भावुक पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या दु:खाला वाट मोकळी करुन दिली होती. (Mrunal Kulkarni’s reaction to mother’s death)

मृणाल यांनी सोशल मीडियावर “आता काही व्यक्त होण्याची ताकद नाही. आईला तिच्या कठीण काळात प्रेम देणाऱ्या, वेळी-अवेळी एका फोनवर धावून येणाऱ्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. मधुरा आणि मी तुमच्यामुळे हसरा चेहरा ठेवून अवघड कामगिरी पार पाडू शकलो. आईला फुलांची प्रचंड आवड. शेवटपर्यंत ती त्याच फुलांप्रमाणे चेहऱ्यावर प्रसन्न हसू ठेवून जगली. तिची उणीव जरी भासली तरी, तिने जोडलेल्या मोठ्या मित्रपरिवाराच्या आणि तिने लिहिलेल्या अनमोल कलाकृतींच्या रुपाने तिची सोबत कायम असेल”. अशी भावुक पोस्ट शेअर केली होती.

View this post on Instagram

A post shared by MAJJA PINK (@majjapink)

अशातच आता मृणाल यांनी पहिल्यांदाच आपल्या आईच्या निधनानंतर आठवणीत भावुक प्रतिक्रिया दिली आहे. मृणाल कुलकर्णी या लवकरच त्यांच्या आगामी ‘गुलाबी’ चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. २२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच पार पडला. यावेळी मृणाल यांनी आपल्या आईविषयी पुन्हा एकदा सर्वांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या.  

आणखी वाचा – नितीन कुमारच्या मृत्यूचं खरं सत्य समोर, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल, गळफास लावून घेतला अन्…

यावेळी आईबद्दल बोलताना मृणाल यांनी असं म्हटलं की, “अगदी मनापासून बोलायचे झाले तर आज मी इथे यायचं धाडस केलं आहे. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की, माझ्या घरी एक दुर्दैवी घटना घडली. पण माझी खात्री आहे की, माझ्या आईची अशीच इच्छा असणार की, थांबायचं नाही. आपल्या जबाबदाऱ्या आणि आपले कर्तव्य मन:पूर्वक पार पाडायचे”.

आणखी वाचा – शेतात जेवण, अंगणात बसून गप्पा अन्…; अंकिताने होणाऱ्या नवऱ्यासह सूरज चव्हाणच्या गावी केली धमाल, साधेपणाचं होतंय कौतुक

दरम्यान, ‘गुलाबी’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचला मृणाल कुलकर्णी यांच्यासह अभिनेत्री श्रुती मराठे व चित्रपटातीळ इतर कलाकारही उपस्थित होते. गुलाबी थीम असणाऱ्या या सोहळ्यात चित्रपटाची संपूर्ण टीम सहभागी झाली होती. यावेळी ‘गुलाबी’च्या मॅशअपवर लहानग्यांनी सुंदर सादरीकरणही केले. गुलाबी नगरी, जयपूरच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या तीन स्त्रियांच्या मैत्रीचा हा प्रवास प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करणारा ठरणार आहे. 

Tags: Mrunal Kulkarni mother's deathMrunal Kulkarni's reaction to mother's deathVeena Dev passed away
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bhool Bhulaiyaa 3 song program children crowding around actor Karthik Aaryan while ignoring singer Sonu Nigam video viral on social media.

'भुल भूलैय्या'च्या साँग लाँचला सोनू निगमकडे दुर्लक्ष, सगळे कार्तिक आर्यनकडेच धावत गेले अन्…; अपमानास्पद वागणूक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.