छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध टीव्ही अभिनेते नितीन चौहानचे शुक्रवारी आकस्मिक निधन झाले आणि अभिनेत्याच्या निधनाने संपूर्ण सिनेविश्वावर शोककळा पसरली. नितीनने वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. नितीन चौहानच्या निधनाची माहिती विभूती ठाकूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्टद्वारे दिली होती. विभूती ठाकूरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली असून या स्टोरीमध्ये अभिनेत्रीने नितीनबरोबरचा स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. कालपर्यंत अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण समोर आले नव्हते. मात्र आता त्याच्या मृत्यूबद्दलची माहिती समोर आली आहे. (Nitin Chauhan Suicide)
नितीन चौहान उर्फ नितीन सिंहच्या निधनाचे कारण स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नितीनने आत्महत्या केली आहे. त्याने त्याच्या स्वत:च्या राहत्या गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, नितीनने गुरुवारी (७ नोव्हेंबरला) मुंबईतील गोरेगाव येथील स्वत:च्या राहत्या घरात आत्महत्या केली. काम मिळत नसल्याने तो नैराश्यात असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. अनेक वर्षांपासून तो नैराश्यातून सावरण्यासाठी थेरपी आणि औषधेही घेत होते, मात्र त्याला यात यश मिळाले नाही. अखेर नितीनने राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.
आणखी वाचा – 09 November Horoscope : मेष, सिंह, कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस आर्थिक सावधगिरीचा, जाणून घ्या…
गुरुवारी संध्याकाळी त्याची पत्नी मुलीला घेऊन बाहेर गेली होती. घरी फक्त नितीन एकटाच होता, त्यावेळी त्याने गळफास घेतला. नितीनची पत्नी काही वेळाने घरी आली तेव्हा तिने दार ठोठावले, पण नितीने दार उघडले नाही. त्यामुळे तिने शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडले. घरात नितीन बेडशीटने गळफास घेतलेल्या अवस्थे आढळला. त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.
आणखी वाचा – Bigg Boss Matathi 5 फेम अभिनेत्याने घेतली नवीन कार, व्हिडीओद्वारे दाखवली खास झलक
दरम्यान, नितीन चौहान हा यूपीच्या अलीगढ जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याने MTV चा Splitsvilla Season 5 हा शोदेखील जिंकला. याशिवाय नितीन ‘क्राईम पेट्रोल’ आणि ‘फ्रेंड्स’ सारख्या मालिकांमध्येही दिसला होता. ‘जिंदगी डॉट कॉम’मध्येही नितीनने काम केलं. नितीन चौहानला ‘क्राईम पेट्रोल’मधून विशेष ओळख मिळाली. नितीनच्या शेवटच्या टीव्ही मालिकेबद्दल बोलायचे झाले तर तो २०२२ मध्ये ‘तेरा यार हूं मैं’ या टीव्ही शोमध्ये दिसला होता