सोनू निगम हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायकांपैकी एक आहे. आजही त्यांची गाणी प्रेक्षकांना खूप आवडतात. त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. तर, त्याने अनेक गाण्याच्या शोचे परीक्षणही केले आहे. सोनू निगम हा केवळ गायकच नाही तर तो अभिनेताही आहे. त्याचे अनेक फोटो व व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आशातच सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात सोनू निगमकडे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळाले. बॉलिवूड गायक सोनू निगमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो कार्तिक आर्यनबरोबर आहे. (Children Ignore Sonu Nigam)
सोनू निगमने कार्तिक आर्यनच्या नुकत्याच आलेल्या ‘भूल भुलैया ३’ या चित्रपटात एक गाणे गायले आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला असला तरी कलाकारांकडून या चित्रपटाचे प्रमोशन सुरु आहे. आशातच कार्तिक आर्यन ‘भूल भुलैया ३’ च्या प्रमोशनसाठी सोनू निगमबरोबर पोहोचला होता. जिथे काही मुलं स्टेजवर येतात आणि त्यापैकी एकाने सोनू निगमच्या पायाला स्पर्श केला आणि तिथे उपस्थित असलेली बाकीची मुलं सोनू निगमकडे दुर्लक्ष करतात आणि सगळे कार्तिक आर्यनबरोबर सेल्फी काढू लागतात.
Sadly! for this generation, Sonu Nigam is just a playback singer pic.twitter.com/OlGFr4Gxid
— Indian Music (@Music_Vichaar) November 8, 2024
हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी आपली मते मांडण्यास सुरुवात केली. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने मत मांडत असं म्हटलं आहे की, “लोक सोनू निगमला फक्त पार्श्वगायक म्हणून पाहू लागले आहेत”. तर आणखी एकाने असं म्हटलं आहे की, “या मुलांना सोनू निगमबद्दल माहितीही नाही, मग यात सोनू निगमचा अपमान कुठे होतो”, तर दुसऱ्याने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “कार्तिक आर्यन हा नव्या पिढीचा हिरो आहे, मुले त्याला जास्त ओळखतात”. तसंच आणखी एकाने “आजकालची मुलं खरी प्रतिभा ओळखत नाहीत हे खरच खेदजनक आहे” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दरम्यान, ‘भूल भुलैया ३’च्या गाण्याच्या कार्यक्रमात सोनू निगमने कार्तिकच्या मेहनतीचे कौतुक केले आणि त्याला ‘सर्वात मेहनती अभिनेत्यांपैकी एक’ म्हटले. त्याचबरोबर कार्तिकने असं मतला की, “मुलांबरोबर परफॉर्म करण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे आणि हा अनुभव अनोखा आहे”. यावेळी त्याने सोनूचेही कौतुक केले आणि त्याच्याबरोबर काम करण्याबद्दल सन्मानित वाटत असल्याचे सांगितले.