‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व संपले असले तरी या शोची आणि शोमधील स्पर्धकांची चर्चा अजूनही कमी होताना दिसत नाहीये. गेल्या काही दिवसांत ‘बिग बॉस मराठी’चे अनेक स्पर्धक या ना त्या कारणाने चर्चेत आहेत. ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व संपल्यानंतर घरातील सर्वच स्पर्धक एकमेकांच्या भेटी घेत आहेत. गेल्या काही दिवसांत इरीना व वैभव ही डीपी यांच्या गावी गेल्याचे पाहायला मिळाले. तसंच डीपी, वैभव, इरीना ही तिघे सूरजच्या गावी गेले होते. जान्हवीदेखील भाऊबीजसाठी सूरज चव्हाणच्या गावी गेली होती. अशातच आता अंकिता वालावलकरदेखील सूरजच्या गावी पोहोचली. (Ankita Walawalkar and Suraj Chavan meeting)
अंकिता सूरजच्या गावी गेल्याचा व्हिडीओ सूरजच्या युट्यूब वाहिनीद्वारे शेअर करण्यात आला असून यात अंकिता तिच्या होणाऱ्या नवऱ्यासह म्हणजेच कुणाल भगतबरोबर सूरजच्या गावी गेल्याचे पाहायला मिळाले. या व्हिडीओमध्ये सूरज अंकिता व तिच्या होणाऱ्या नवऱ्याला घेऊन मरीआईच्या देवळातही गेली होती. त्यांच्या हा व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. अशातच अंकितानेही तिच्या सोशल मीडियाद्वारे सूरजबरोबरच्या भेटीचे काही खास क्षण शेअर केले आहेत. त्याचबरोबर तिने सूरजला तिच्या लग्नाचे आमंत्रणही दिले आहे. अंकिताने शेअर केलेल्या फोटो व व्हिडीओमधून तिने सूरजला उशिरा भेटण्याचे कारणही सांगितले आहे.
अंकिताने शेअर केलेल्या पोस्टखाली असं म्हटलं आहे की, “बिग बॉस’नंतर भेटायचं म्हटलं तर त्याच्याकडे होणाऱ्या गर्दीचा विचार करून मी आरामात भेटायचं ठरवलं खरं, पण त्याला वाटू लागलं की पॅडी दादा आणि अंकिता ताई येत का नाहीत…खरंतर माझ्या त्रासासाठी नाही, पण त्याला होणारा त्रास कमी होईल म्हणून उशीरा भेट घ्यायची होती…रोज असणारी फोटोसाठी प्रचंड गर्दी आणि महाराष्ट्राच प्रेम त्याच्यामागे असंच कायम राहूदे… आणि हो मी लग्नाचं आमंत्रण पण दिलं”. अंकिताने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती व तिचा होणारा नवरा कुणाल भगत सूरजच्या कुटुंबियांबरोबर मजामस्ती करतानाचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 फेम अभिनेत्याने घेतली नवीन कार, व्हिडीओद्वारे दाखवली खास झलक
त्याचबरोबर अंकिताने सूरज व त्याच्या कुटुंबियांसह शेतात खास जेवणही केलं आणि याचेही काही खास फोटो तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत अंकिताने असं म्हटलं आहे की, “बिग बॉसच्या घरात असताना सूरज नेहमी म्हणायचा माझ्या घरी चटणी भाकर खायला येशील? आणि मी “हो” म्हटलं की तो म्हणायचा “खरच… अगं बाया गं…” तर ही होती आमची “अगं बाया गं Moment”
आणखी वाचा – नितीन कुमारच्या मृत्यूचं खरं सत्य समोर, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल, गळफास लावून घेतला अन्…
दरम्यान, अंकिताने शेअर केलेल्या या फोटोला तिच्या व सूरजच्या अनेक चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. “हे कसं आता रिअल वाटत आहे”, “कोकण हार्ट गर्ल नाहीतर महाराष्ट्र हार्ट गर्ल आहात तुम्ही मानलं तुम्हाला तुम्ही जे बोललात ते करून दाखवलं”, “खुप छान विचार आहेत अंकिता खरच आम्हा कोकणवासियांना तुजा अभिमान वाटतो” अशा अनेक कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी अंकिता व सूरजच्या फोटो अन् व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.