शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आजी झाल्यानंतर नीना गुप्तांचा आनंद गगनात मावेना, नातीसह शेअर केला फोटो

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 14, 2024 | 6:39 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
neena gupta social media post

नीना गुप्ता यांची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या सध्या खूप चर्चेत असतात. आजवर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका सकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयाला चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे. वयाच्या ६५ व्या वर्षीदेखील त्यांचा हॉट अंदाजदेखील बघायला मिळतो. त्यांना एक मसाबा नावाची मुलगी असून तीदेखील मनोरंजन क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी ती गरोदर असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले होते. आता काही दिवसांपूर्वीच मसाबाला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. यावर नीना यांनी आजी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी नातीबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट केला यामध्ये नीना यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे. (neena gupta social media post)  

‘पंचायत’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या नीना सध्या आजी झाल्या आहेत. त्यांनी नातीबरोबर एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी फोटो शेअर करत लिहिले आहे की, “माझ्या मुलीची मुलगी. देवाची कृपा”. या फोटोमध्ये नीना यांच्या चेहऱ्यावरदेखील हास्य दिसत आहे. नीना यांच्या पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.

आणखी वाचा – Video : अंबाबाईचे दर्शन, कोल्हापुरी चप्पलची खरेदी अन्…; डीपीसह वैभव-इरीनाची कोल्हापुर सफर, व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

मसाबा व तिचे पती सत्यदीप मिश्रा यांच्या मुलीचा जन्म ११ ऑक्टोबर रोजी झाला. याच दिवशी अमिताभ बच्चन यांचादेखील वाढदिवस असतो. त्यांनी मुलीच्या पायांच्या ठश्यांचे फोटोदेखील शेअर केले आहेत. त्यांनी सर्वात आधी मुलीच्या जन्माची एक पोस्ट शेअर केली होती. त्यांनी लिहिले होते की, “आमची छोटीशी मुलगी एका खास दिवशी जन्माला आली आहे”. दसऱ्याच्या दिवशी ही गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. २०२३ साली ते दोघंही लग्नबंधनात अडकले होते.

आणखी वाचा – शाहरुख खानच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, मृत्यूपूर्वी अभिनेत्याकडे व्यक्त केली होती इच्छा, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

याआधी मसाबा निर्माता मधु मंटेनाबरोबर लग्नबंधनात अडकली होती. मात्र २०१९ साली त्यांचा घटस्फोट झाला. तसेच सत्यदीपचे पहिले लग्न अदिती राव हैदरीबरोबर झाले होते. २०१३ साली ते वेगळे झाले. मसाबाने आपल्या आईप्रमाणे अभिनय क्षेत्र न निवडता फॅशन डिझाइनर म्हणून आपले करियर सुरु केले.  

Tags: masaba daughterneena guptaviral post
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Kanye West wanted to sex with his mother-in-law ex-wife Bianca Sensari alleged that see the details

सासूबरोबर संबंध बनवण्याचा प्रयत्न, लैंगिक छळ अन्…; रॅपर कान्ये वेस्टवर असिस्टंटचे गंभीर आरोप, म्हणाली, "मला ड्रग्ज देऊन…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.