अमेरिकन मीडिया पर्सनॅलिटी किम कार्दशियनचा माजी पती आणि अमेरिकन रॅपर-गायक कान्ये वेस्टशी हा कायम चर्चेत राहत असतो. त्यावर सतत नवनवीन आरोप होत असतात. अशातच आता त्याच्यासंबंधित आणखी एक बातमी समोर येत आहे. रॅपर कान्ये वेस्टच्या एका माजी सहाय्यकाने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे, ज्यामध्ये बलात्कारापासून अनेक खळबळजनक दावे करण्यात आले आहेत. लॉरेन पिसिओटा नावाच्या या माजी सहाय्यकाने आरोप केला आहे की, सीन ‘डिडी’ कॉम्ब्सबरोबर स्टुडिओ सत्रादरम्यान तिच्यावर बलात्कार झाला होता. कान्ये वेस्टने तिच्या ड्रिंकमध्ये ड्रग्ज मिसळले आणि नंतर ती नशेत असताना तिच्यावर बलात्कार केला, असे पिसिओटाचे म्हणणे आहे. (Kanye West News)
इतकेच नाही तर कान्येला त्याची माजी पत्नी बियान्का सेन्सारीच्या आईबरोबर म्हणजेच त्याच्या सासूबरोबरही शारीरिक संबंध करायचे होते, असा दावाही महिलेने केला आहे. लॉरेन पिसिओटा २०२१ ते २०२२ पर्यंत कान्ये वेस्टची सहाय्यक होती. पीपल मॅगझिनने पिसिओटा यांनी दाखल केलेल्या खटल्याचा हवाला देत हे खुलासे केले आहेत. पिसिओटाने आपल्या तक्रारीत दावा केला आहे की, कान्ये वेस्टचे ज्या लोकांशी संबंध असायचे, त्याला त्या महिलांच्या आईबरोबर देखील शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छा होती.
लॉरेन पिसिओटा ही ‘ओन्ली फॅन्स’ मॉडेल आहे. याचिकेत तिने आरोप केला आहे की कान्ये वेस्टने तिच्या ड्रिंकमध्ये ‘ड्रग’ मिसळले आणि नंतर कॅलिफोर्नियातील सीन ‘डिडी’ कॉम्ब्सबरोबर स्टुडिओ सत्रादरम्यान तिच्यावर हल्ला केला. तिने दावा केला की रॅपरने त्याच्यासाठी ड्रिंक ऑर्डर केले होते. ते प्यायल्यानंतर काही वेळ तिला शुद्ध आली नाही. याबद्दल तिने म्हटलं की, “काही वेळानंतर मला विचित्र वाटू लागले. मला जाग आली तेव्हा काहीच आठवत नव्हते. पण मला खूप लाज वाटत होती. त्यानं माझा लैंगिक छळ केला होता”.
आणखी वाचा – बच्चन कुटुंबियांबरोबर राहतच नाही ऐश्वर्या राय, ‘त्या’ व्हिडीओनंतर भांडणाचं सत्य समोर, घडलं असं काही की…
दरम्यान, असं म्हटलं जातं की कान्ये वेस्टनं २०१४ मध्ये किम कर्दाशियनशी लग्न केलं होतं. त्यानंतर २०२२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्याच वर्षी कान्येनं बियांका सेंसरीशी लग्न केलं. दोन दिवस आधीच कान्ये वेस्टवर त्याच्या दोन्ही पूर्वाश्रमीच्या पत्नींची हेरगिरी करण्याचा आरोप लागला होता.