‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व आता संपले असले तरी या पर्वातील स्पर्धकांची चर्चा काही संपलेली नाही. ‘बिग बॉस मराठी ५’ मधील सर्व स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणाने कायमच चर्चेत राहत असतात. यापैकी डीपी, सूरज, वैभव व इरीना यांच्या अनेक चर्चा होताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धकांचे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व फोटो व्हायरल होतात आणि या फोटो व व्हिडीओला नेटकऱ्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळतो. अशातच सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात डीपी म्हणजेच धनंजय पोवार, वैभव चव्हाण व परदेशी गर्ल इरीना रुडाकोवा पाहायला मिळत आहेत. (Dhananjay Vaibhav Irina Ambabai Darshan)
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये डीपी, वैभव व इरीना हे कोल्हापुरमधील अंबाबाईचे दर्शन घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी डीपी, वैभव व इरीना यांनी गाभाऱ्यात जाऊन देवीचे दर्शन घेतलं. तसंच यावेळी त्यांनी ओटीदेखील भरली. मंदिराला प्रदक्षिणा मारत या तिघांनी देवीचे दर्शन घेतलं. दर्सन घेऊन बाहेर येताच या तिघांची चाहत्यांनी भेट घेतली. डीपी, वैभव व इरीना यांना पाहण्यासाठी मंदिराबाहेर प्रचंड गर्दी झालेली या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
तसंच डीपी, वैभव, इरीना यांनीही चाहत्यांना फोटो व सेल्फी दिली. त्यानंतर शाळकरी मुलांनी या तिघांना गराडा घातला. यावेळी इरीनाने कहाण मुलांबरोबर खास संवाद साधला. तसंच यावेळी इरीनाने सूरज चव्हाणच्या स्टाईलमध्ये झापूक झुपूक डान्सही केला. देवीचे दर्शन, चाहत्यांशी संवाद झाल्यानंतर या तिघांनी तिथल्या स्थानिक प्रसार माध्यमांशीदेखील संवाद साधला. हे सगळं झाल्यानंतर डीपी, वैभव व इरीना यांनी खरेदीही केली. यावेळी इरीनाने खास कोल्हापुरी चप्पलही घेतली.
आणखी वाचा – बच्चन कुटुंबियांबरोबर राहतच नाही ऐश्वर्या राय, ‘त्या’ व्हिडीओनंतर भांडणाचं सत्य समोर, घडलं असं काही की…
दरम्यान, डीपी, वैभव व इरीना यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “वैभव भावा मन जिंकलं तू”, “इरिना तुझ्याबद्दल आदर”, “बिगबॉस ५च्या कलाकाराना कोणताच माज नाही, कारण हे कलाकर आपल्या मराठी मातीमध्ये मराठी संस्कृती जपत मोठे झाले आहेत”, “वैभव, डीपी तुम्ही माणूस म्हणून खुप भारी आहात” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.