बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या सध्या खूप चर्चेत असतात. आजवर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका सकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयाला चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे. वयाच्या ६५ व्या वर्षीदेखील त्यांचा हॉट अंदाजदेखील बघायला मिळतो. त्यांना एक मसाबा नावाची मुलगी असून तीदेखील मनोरंजन क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी ती गरोदर असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले होते. आता काही दिवसांपूर्वीच मसाबाला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. यावर नीना यांनी आजी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी नातीबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट केला यामध्ये नीना यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे. (neena gupta social media post)
‘पंचायत’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या नीना सध्या आजी झाल्या आहेत. त्यांनी नातीबरोबर एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी फोटो शेअर करत लिहिले आहे की, “माझ्या मुलीची मुलगी. देवाची कृपा”. या फोटोमध्ये नीना यांच्या चेहऱ्यावरदेखील हास्य दिसत आहे. नीना यांच्या पोस्टने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.
मसाबा व तिचे पती सत्यदीप मिश्रा यांच्या मुलीचा जन्म ११ ऑक्टोबर रोजी झाला. याच दिवशी अमिताभ बच्चन यांचादेखील वाढदिवस असतो. त्यांनी मुलीच्या पायांच्या ठश्यांचे फोटोदेखील शेअर केले आहेत. त्यांनी सर्वात आधी मुलीच्या जन्माची एक पोस्ट शेअर केली होती. त्यांनी लिहिले होते की, “आमची छोटीशी मुलगी एका खास दिवशी जन्माला आली आहे”. दसऱ्याच्या दिवशी ही गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. २०२३ साली ते दोघंही लग्नबंधनात अडकले होते.
याआधी मसाबा निर्माता मधु मंटेनाबरोबर लग्नबंधनात अडकली होती. मात्र २०१९ साली त्यांचा घटस्फोट झाला. तसेच सत्यदीपचे पहिले लग्न अदिती राव हैदरीबरोबर झाले होते. २०१३ साली ते वेगळे झाले. मसाबाने आपल्या आईप्रमाणे अभिनय क्षेत्र न निवडता फॅशन डिझाइनर म्हणून आपले करियर सुरु केले.