बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या खूप चर्चेत आहे. त्याच्याबद्दल नुकतीच एक अपडेट समोर आली आहे. दिल्लीच्या शाळेतील टीचर एरिक स्टीव्ह डिसुजाचं निधन झालं आहे. नवी दिल्ली येथील सेंट कोलंबस स्कूलमध्ये त्याने शाहरुख खानला शिकवलं होतं. गोवा येथे रविवारी दुपारी दीड वाजल्याच्या सुमारास त्याने अखेरचा श्वास घेतला. याआधी अनेकदा शाहरुखने त्याच्या आजारी शिक्षकांना भेटावे अशी सोशल मीडियावर विनंती केली जात होती. मात्र असे होऊ शकले नाही. अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतला. यामुळे आता शाहरुख खूप दु:खी असल्याचंदेखील बोललं जात आहे. दरम्यान आता सोशल मीडियावरदेखील याबद्दलची चर्चा रंगली आहे. (shahrukh khan teacher death)
कॉँग्रेस नेते सजारिता लॅटफ्लाग यांनी या वर्षी जून महिन्यात सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी शाहरुखकडे एक मागणी केली होती. यामध्ये त्यांनी शाहरुखने शिक्षक ब्रदर एरिक स्टीव्ह डिसूजा यांची भेट घ्यावी असे सांगितले होते. त्यांनी लिहिले होते की, “मला असं वाटत आहे की ही माझी शेवटची मागणी आहे. एरिक एस डिसूजा यांच्यातर्फे मी शाहरुख खानपर्यंत पोहोचण्याचा माझा हा शेवटचा प्रयत्न आहे”.
पुढे त्यांनी लिहिले की, “दिवसेंदिवस एरिक यांची तब्येत खराब होत चालली आहे. मुंबईमधून विमानाने केवळ एका तासाच्या अंतरावर आहे. त्या आजारी असलेल्या व्यक्तीला सध्या सांत्वनाची गरज आहे. आपल्या आयुष्यात डीएएसयूची महत्त्वाची जागा राहिली आहे. यामुळे आपण आयुष्यात खूप काही करु शकलो आहोत. तुमचा आतापर्यंतचा प्रवास हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. पण त्यांच्या वाईट प्रसंगी तुमची उपस्थिती महत्त्वाची असणार आहे”.
मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी ब्रदर एरिक स्टीव्ह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, “मला ब्रदर एरिक स्टीव्ह डिसूजा यांच्या निधनाबद्दल माहीत पडलं. ते शिक्षण व करुणा यासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले होते. आम्ही शिलॉंग येथील सेंट एडमंट स्कूल येथे अनेक वर्ष एकत्रितपणे घालवली आहेत. त्यांच्या निधनामुळे आम्हाला खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो”. दरम्यान आता ब्रदर एरिक डिसूजा यांच्या निधनावर शाहरुखने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.