रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रतन टाटा यांना अखेरचा निरोप, शेवटचं पाहण्यासाठी पूर्वाश्रमीच्या पत्नीसह पोहोचला आमिर खान, अभिनेता भावुक

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 10, 2024 | 6:46 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
aamir khan tribute to ratan tata

आमीर खानने रतन टाटा यांना केले शेवटचे अभिवादन

भारतीय उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खूप खालावली होती. त्यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची काल रात्री प्राणज्योत मालवली. बुधवारी रात्री उशिरा त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर मनोरंजन तसेच सर्वच स्तरातील दिग्गजांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.  अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव नरीमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA)येथे ठेवले होते. या ठिकाणी सगळ्यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. यावेळी उपस्थित असणाऱ्यांच्या भावना दाटून आल्याचेही दिसून आले. (aamir khan tribute to ratan tata)

दिवंगत रतन टाटा यांनी निधनाच्या काही दिवस आधी सोशल मीडियावर त्यांच्या तब्येतीबद्दलची एक पोस्ट केली होती. सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, “रुग्णालयात भरती होण्याबद्दल कोणतेह अंदाज बांधू नयेत. तसेच वयानुसार सगळ्या तपासणी करण्यासाठी रुग्णालयात गेलो होतो”. अशातच त्यांच्या अंतिम दर्शनाचे फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार उपस्थित असलेले दिसून येत आहेत.

आणखी वाचा – मालिकांमध्ये काम करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लग्नाच्या तीन वर्षांनंतर कन्यारत्न, कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

‘ANI’ने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, यामध्ये अभिनेता आमिर खान व त्याची पूर्व पत्नी किरण राव दिसून येत आहेत. दोघंही त्यांच्या पार्थिवासमोर हात जोडून उभे असलेले दिसत असून भावुकदेखील झाले आहेत. आमिरने वाकून रतन टाटा यांना अभिवादन केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांना राहतं घर सोडावं लागणार, ईडीकडून नोटीस, १० दिवसांत बंगल्यामधून जावं लागणार

रतन टाटा यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांच्या आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर त्यांच्या आजी आजोबांनी दत्तक घेतले होते. त्यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ओग आर्किटेक्चरमधून पदवी प्राप्त केली होती. १९६१ साली त्यांनी व्यवसायामध्ये पाऊल ठेवले. पुढे त्यांनी काम करत टाटाच्या १०० हून अधिक कंपन्या सुरु केल्या आहेत. तसेच संपूर्ण देशभरात त्यांची खूप लोकप्रियता होती.     

Tags: aamir khanlast ritesratan tata
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Shivani Rangole Post

रील व रिअल लाईफ सासूबाईंबरोबर शिवानी रांगोळेची धमाल, एकमेकींना खेचतानाचे फोटो व्हायरल, म्हणाली, "तुम्ही दोघी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.