बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही नेहमी चर्चेत असते. शिल्पा शेट्टीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. शिल्पाच्या अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्याचेदेखील अनेक चाहते आहेत. तसेच तिच्या फिटनेसचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात. काही वर्षांपूर्वी शिल्पा उद्योजक राज कुंद्राबरोबर लग्नबंधनात अडकली होती. काही महिन्यांपूर्वी राज एका केसमध्ये अडकला होता. अशातच आता इडीने त्यांच्या राहत्या घरावर जप्ती आणण्याचा निर्णय घेतला आहे. शिल्पा व राज यांचा मुंबई येथील जुहूमध्ये असलेला अलिशान बंगला खाली करण्याची नोटिस दिली आहे. त्यामुळे ती आता पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आला आहे. (shilpa shetty ed notice)
शिल्पा व राज यांच्या समस्या संपण्याची नाव काही येत नाही. इडीने क्रिप्टो मालमत्तेच्या फसव्या स्कीम प्रकरणात अभिनेत्रीला पावना तलाव येथील फार्महाऊसवर जप्ती आणली आहे. तसेच आता त्यांना नोटिस पाठवून घर खाली करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता दोघांनीही या नोटिसला उत्तर देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहेत.
शिल्पा व राज यांनी वकील प्रशांत पाटील यांच्याकडून न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये सांगितले आहे की, “शिल्पा व राज यांना २७ डिसेंबर २०२४ ला इडीकडून नोटिस मिळाली आहे. मात्र हे सगळे अर्थहीन आहे. तसेच निष्काळजीपणा आणि मनमानी कारभार असल्याचे म्हणाले आहेत”. दरम्यान आता शिल्पा व तिच्या कुटुंबीयांच्या अधिकारांचे रक्षण करावे असेही सांगितले आहे. इडीने दिलेल्या नोटिसमध्ये १० दिवसांच्या आत मुंबईतील घर व पुण्यातील फार्म हाऊस खाली करण्याचे आदेशदेखील दिले आहेत.
दरम्यान याबद्दल शिल्पा व राज यांच्या विरोधात २०१८ पासून कारवाई सुरु आहे. या जोडीने इतर आरोपीबरोबर मिळून बीट कॉइनच्या रुपात गुंतवणूकदारांकडून ६ कोटी रुपयांची फसवणूक केली होती. मात्र यामध्ये दोघांनीही २०१८ ते २०२४ च्या दरम्यान इडीकडून जितक्या नोटिस आल्या तेव्हा प्रत्येक समन्सला उत्तर दिले आहे. दरम्यान आता शिल्पा व राज यांच्याबद्दल नक्की काय होणार? याबद्दल प्रश्न उपस्थित राहिले आहेत.