शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

काय असणार दीपिका पदुकोण व रणवीर सिंहच्या लेकीचं नाव? अभिनेत्याने केला होता खुलासा, पण…

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 9, 2024 | 12:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
deepika padukone and ranveer singh baby name

दीपिका पदुकोण व रणवीर सिंह मुलीचे नाव काय ठेवणार?

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी दीपिका पदुकोण व रणवीर सिंह हे नेहमी चर्चेत असतात. हे वर्ष सुरु झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यांनी आई-वडील होणार असल्याची घोषणा केली होती. सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार असे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले होते. त्यानंतर अनेकदा त्यांना एकत्रितपणे स्पॉट केले गेले. तसेच काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर बेबी बम्प फ्लॉन्ट करतानाचे बोल्ड फोटोशूटदेखील शेअर केले होते. या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंती मिळाली होती. अशातच आता काल (8 सप्टेंबर) दीपिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. (deepika padukone and ranveer singh baby name)

गणेशोत्सवादरम्यान दीपिकाने मुलीला जन्म दिल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे देण्यात आली. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करुन याबद्दलची माहिती देण्यात आली. चाहत्यांनी तसेच सर्व सेलिब्रिटिंनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आता त्यांच्या मुलीचे नाव काय ठेवणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याबद्दल आता रणवीरची जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. होणाऱ्या बाळाचे नाव काय असणार? याची लिस्ट रणवीरने तयार केली असल्याचे सांगितले होते. ‘द बिग पिक्चर’च्या एका एपिसोडमध्ये त्याने लिस्टमधील एक नाव सांगितले होते.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “विश्वास कोणावर ठेवायचा?”, अंकिता व डीपी करत आहेत अभिजीतबद्दल गॉसिप, दोघांनाही खटकतंय वागणं, म्हणाला, “पहिला घाव…”

View this post on Instagram

A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)

यावेळी शौर्यवीर नावाच्या एका स्पर्धकाशी बोलताना रणवीरने त्याचे नाव विचारले. त्याने शोमध्ये सांगितले की, “मी बाळाच्या नावांचा विचार करत आहे. पण तुम्हाला काही हरकत नसेल तर मला तुमच्या नावाचा विचार करेन. मी माझ्या मुलाचं नाव शौर्यवीर ठेवण्याचा विचार करत आहे”. पण त्याच्या घरी मुलीचे आगमन झाले आहे.

आणखी वाचा – ढोल-ताशा वाजवला, बेधुंद होऊन ठेकाही धरला अन्…; शिल्पा शेट्टीच्या बाप्पाचे धुमधडाक्यात झालं विसर्जन, नवरा व लेकीसह थिरकताना दिसली

दरम्यान, २०२२ साली रणवीरचा ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याला विचारले की, “मुलगा हवा की मुलगी?”, त्यावर त्याने उत्तर दिले की, “कोणीही चालेल. जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तेव्हा शिरा पाहिजे की लाडू असं तर तुम्ही विचारत नाही ना? जे मिळत ते श्रद्धेने घेता. त्यामुळे बाळाच्या बाबतीतदेखील मी सारखाच विचार करतो”. त्यामुळे आता रणवीर व दीपिका लेकीचं काय नाव ठेवणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Tags: baby girldeepika padukoneranveer singh
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Anant Ambani - Radhika Merchant Ganeshotsav

Video : गणपती विसर्जनात बेधुंद होऊन थिरकले अनंत अंबानी व राधिका मर्चंट, एकमेकांना गुलालही लावला अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.