‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ च्या घरात आता दोन टीम पडलेल्या दिसत असतानाच आता या दोन्ही टीममध्येही फूट पडलेली दिसत आहे. टीम ए मधून निक्की व अरबाज बाहेर पडले आहेत, त्यामुळे वैभव, जान्हवी आता वेगळे खेळू लागले आहेत. यानंतर इकडे टीम बी मध्येही काहीशी बाचाबाची सुरु असलेली पाहायला मिळत आहे. टीम बी एकत्र खेळत असली तरी त्यांच्यामध्येच वाद असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिजीतचा स्वभाव टीम बी मधील स्पर्धकांना खटकू लागला आहे. त्यामुळे आता टीम बी मधील स्पर्धक अभिजीतपासून दूर जाताना दिसत आहेत. (Bigg Boss Marathi season 5)
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, अंकिता व डीपी बोलत असतात, तेव्हा अंकिता डीपीला म्हणते, “डीपी दादा तुम्ही नॉमिनेशनमध्ये तेव्हा तुम्ही मला विश्वासाबद्दल एक वाक्य बोलला होता. मला अशी पलटणारी लोकांची भीती वाटते. खरंच. म्हणजे मरायला आलेला माणूस ज्याला माहित आहे की जो काही दिवसांत मरणार आहे तेव्हा तो सगळं काही खरं खरं बोलून जातो. तसं मी या घरातून जाणार होते तेव्हा मला माहित होतं की मी जाणार आहे म्हणून मी सगळं सगळं खरं खरं बोलले. तेव्हा मी अभिजीतला बोलले, स्टॅन्ड घे. पलटू नकोस.
आणखी वाचा – ‘बिग बॉस’मध्ये Wild Card स्पर्धक म्हणून संग्राम चौगुलेची एण्ट्री, घरात प्रवेश घेताच दिली धमकी अन्…
यावर डीपी म्हणतो, “आणखी एक वाक्य बोलली होती”. यावर अंकिता म्हणाली, “माहित आहे विश्वास कोणावर ठेवायचा?”. त्यावर डीपी म्हणाला, “हा ग्रुप तू सोप्पा समजतेस पण पहिला घाव तुझ्यावर आणि माझ्यावरच घालणार”. एकूणच अभिजीतच वागणं हे स्पर्धकांना खटकत असून तो विश्वासघात करणाऱ्यांपैकी एक आहे असं त्यांचं म्हणणं असल्याचं दिसत आहे.
आणखी वाचा – गणरायाच्या दर्शनासाठी सासरवाडीला पोहोचला प्रथमेश परब, बायकोबरोबरचा फोटो केला शेअर, पारंपरिक लूकही लक्षवेधी
मध्यंतरी अभिजीत टीम ए मधील निक्की तांबोळीबरोबर दिसला. निक्की तांबोळी बरोबर अभिजीतची पहिल्या दिवसापासून मैत्री होती मात्र ते दोघे वेगवेगळ्या टिममधून खेळताना दिसले. असं असलं तरी अभिजीत व निक्की यांची मैत्री असल्याने तो निक्की विरोधात कधीच बोलताना दिसला नाही त्यामुळे टीम बी मधील स्पर्धकांना त्याच हे वागणं खटकायचं.