देशभरात गणपती बाप्पाचा जयजयकार होताना पाहायला मिळत आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. विशेषतः मुंबईत बॉलीवूड सेलिब्रिटी देखील गजाननाची मूर्ती त्यांच्या घरी आणतात, विधीपूर्वक तिची पूजा करतात आणि नंतर निरोप देतात. सर्वसामान्यांबरोबर आता कलाकारांचे बाप्पाही विशेष चर्चेत असलेले पाहायला मिळतात. अशातच बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टीही दरवर्षी गणेश चतुर्थी उत्साहात साजरी करते. (Shilpa Shetty Dance During Ganpati Visarjan)
यावर्षीही तिने आपल्या घरी गणपती आणला होता आणि काल दीड दिवसांनी मूर्तीचे विसर्जन केले. विसर्जनावेळी शिल्पा बेधुंद होऊन थिरकताना दिसली. शिल्पाचा नवरा राज कुंद्राबरोबरही ती नाचताना दिसली. तर मुलगी समिषाही यावेळी मागे राहिली नाही आणि तिच्या पालकांसह ठेका धरताना दिसली. शेट्टी कुटुंबाचा हा गणरायाच्या विसर्जनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – उर्मिला कोठारेच्या लेकीने दिलं गोड सरप्राइज, घरी बाप्पांना विराजमान केलं, व्हिडीओ पाहून कौतुकाचा वर्षाव
शिल्पा शेट्टीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावेळी अभिनेत्रीने परिधान केलेल्या पिवळ्या रंगाचा ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. ती आणि राज कुंद्रा ढोलाच्या तालावर खूप नाचले. त्यांच्याबरोबर मुलगी समिषा आणि कुटुंबातील इतर सदस्यही दिसले. विसर्जनावेळी मुलगा विआन दिसला नाही, त्यामुळे त्याला चाहत्यांनी खूप मिस केले. दुसऱ्या व्हिडीओमध्ये शिल्पा पापाराझींबरोबर थिरकताना दिसत आहे. तर शिल्पा तिची बहीण शमिता शेट्टीबरोबरही डान्स करताना दिसली.
आणखी वाचा – ‘बिग बॉस’मध्ये Wild Card स्पर्धक म्हणून संग्राम चौगुलेची एण्ट्री, घरात प्रवेश घेताच दिली धमकी अन्…
शिल्पाने आपल्या घरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे विसर्जन केले. सर्वांनी बाप्पाला निरोप दिला आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती केली. शिल्पाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर शिल्पा ‘इंडियन पोलिस फोर्स’मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय, शरद केळकर आणि इतर कलाकारांसह दिसली होती. त्याची निर्मिती रोहित शेट्टीने केली असून ही त्याची पहिलीच वेबसीरिज आहे. आता शिल्पा केडी-द डेव्हिल या कन्नड चित्रपटात दिसणार आहे.