शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “तिला काहीच बोललं गेलं नाही”, भाऊच्या धक्क्यावर रितेशने निक्कीची बाजू घेताच सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, म्हणाली, “फक्त ‘टीम बी’ला धारेवर…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 1, 2024 | 3:22 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 5 Saturday bhaucha dhakka actress Vishakha Subhedar shared a post and expressed her displeasure over Riteish Deshmukh taking Nikki Tamboli side

Bigg Boss Marathi 5 मधील निक्की तांबोळीबद्दल आणि भाऊचा धक्का पाहून विशाखा सुभेदार संतापली, शेअर केलेली पोस्ट चर्चेत

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या आठवड्याचा भाऊचा धक्का चांगलाच गाजला. या भाऊचा धक्क्यावर रितेशने आठवडाभरात सर्व स्पर्धकांनी केलेल्या चुकीबद्दल शाळा घेतली. तसंच उत्तम कामगिरी करणाऱ्यांचे कौतूकही केलं. गेल्या आठवड्यात प्रेक्षकांना अरबाजचं रौद्ररुप पाहायला मिळालं होतं. निक्कीशी भांडण करून त्याने घरातील सामानाची तोडफोड केली होती. याबद्दल त्याला रितेशने खडेबोल सुनावले. एवढंच नव्हे तर आर्याची सुद्धा शाळा घेण्यात आली. तसंच अंकितालादेखील तिच्या खेळीबद्दल ओरडा पडला. रितेशने इतर सगळ्या सदस्यांना झापून निक्कीची बाजू घेतल्याने प्रेक्षकांना भाऊच्या धक्क्यावर नाराजी व्यक्त केली आहे. (Vishakha Subhedar On Bigg Boss Marathi 5)

निक्की आतापर्यंत अत्यंत चुकीची खेळत होती. त्यामुळे तिचं एवढं कौतुक करण्याची काहीच गरज नव्हती असा दावा असंख्य नेटकऱ्यांनी केला आहे. मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारसुद्धा या कार्यक्रमात घडणाऱ्या विविध प्रसंगांवर व्यक्त होत असतात. अशातच मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनीही कालच्या भागाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. नुकताच झालेला भाऊचा धक्का आणि निक्कीचा अनसीन अनदेखामधील एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि निक्कीवर संताप व्यक्त केला आहे. फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत विशाखा यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

या पोस्टमध्ये विशाखा यांनी असं म्हटलं आहे की, “काल निक्की सोडून सगळेच चुकले… जे जे दिसलं त्यात सगळेच चुकीचे दिसलें अरबाजने प्यादं केलं उरलेल्या लोकांचं. मान्य आहे चुकलंच! त्याच्यावर (अरबाज+निक्की) तुमचा गेम नकोच असायला. अरबाज आणि निक्की त्यांची त्यांची खेळी खेळत आहेत तुम्ही तुमचं खेळा.! आत्ता धक्का… बी टीमलाच आणि आम्हा प्रेक्षकांनासुद्धा. निक्कीने डबा फोडला. तिच्या ट्रॉमामुळे ती अंधारात गेली नाही, हा तिचा गेम होता. मग अभिजीतला त्याक्षणी ‘टीम बी’ने सपोर्ट न करणं हा त्यांचा गेम असू शकत नाही? जेणेकरून निक्कीला आत जावच लागेल. स्वतंत्र खेळ आणि टीम स्पिरीटचा खेळ आहे. त्यामुळे एकत्र निर्णय घेतला. नियम असूनही ती सपोर्ट करीत नाही तिला काहीच बोललं गेलं नाही? आणि ऑपशन का दिला गेला? नियम म्हणून घरभर फिरायचं आणि टास्क करताना दुसरा गडी वापरायचं? फक्त बी टीमला का धारेवर धरलं जात?”

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “घन:श्यामबरोबर केलं तेच जर…”, ‘त्या’ कृतीबद्दल रितेशने अंकिता वालावलकरला चांगलंच झापलं, म्हणाला, “फार चुकीचं…”

यापुढे अभिनेत्रीने असं म्हटलं आहे की, “आत्ता जरा निक्की बद्दल.. या बाई, निक्कीची चिक्की म्हणजे वाइल्ड कार्ड एन्ट्री. ही घरुनचं ठरवून आलीय, बिग बॉसने घरात न घरात तिच्यासाठी हॅंड्सम मुलगा आणायचा आणि ती प्रेमाचे रंग उधळणार. मग त्याच्या बळाचा ही मुलगी फायदा घेणार आणि आपण प्रेक्षक हे चाळे पाहणार! अरे हे काय आहे? किती स्वार्थी असावं? अप्पलपोटी, ढालगज आणि तिचं हे ज्ञान अभिजीत निमूट ऐकन कसं घेतो. ही निक्कीची रणनीती? याआधी हे एकमेकांत गुंतणं आम्ही पाहिलंय. (पण ते ठरवून नाही वाटलं नंतर नंतर ते कळलंच) पण हे रागावणं खरं खोटं देवास ठाऊक. आणि बाईच्या मिठीत स्वर्ग सारा हे सांगणारा प्रवचन या सीझनमध्येच ऐकला आणि पाहिला”.

आणखी वाचा – बाईऽऽऽ हा काय प्रकार? सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीही ‘बिग बॉस मराठी’च्या प्रेमात, जेवण सोडून शो पाहत बसल्या अन्…; व्हिडीओ व्हायरल  

यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “अरबाज-वैभव भिडले नाहीत. तशी निक्की आणि जान्हवी पण भिडले नाहीत. ती निक्की तर घाबरते जान्हवीला असं मला वाटतं. कारण ती तिच्यासमोर उतरत नाही तिला उलट बोलत नाही आणि वैभव पण घाबरतो अरबाज ला!” दरम्यान, या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी सहमती दर्शवली आहे.  

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 riteish deshmukhvishakha subhedar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Baba Lagin Pachhadlela marathi Movie Fame Amey Hunswadkar struggle story

‘त्या’ भूमिकेनंतर लोकांनी वेडं ठरवलं तेव्हा...; ‘बाबा लगीन’ फेम अभिनेत्याने सांगितली संघर्ष कहाणी, म्हणाला, “रस्त्यावर लोक...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.