सध्या अत्र तत्र सर्वत्र एकाच शोची जोरदार चर्चा होताना दिसत आहे आणि हा लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’. ‘बिग बॉस मराठी’चे नवीन पर्व सुरु होऊन एक महिना उलटला असून दिवसेंदिवस या खेळातील रंगत वाढत चालली असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक प्रेक्षक या शो न चुकता बघत असून सोशल मीडियाद्वारे ही नेटकरी मंडळी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त करतानाचे पाहायला मिळत आहेत. बिग बॉस मराठीची क्रेझ फक्त प्रेक्षकांमध्येच नसून अनेक कलाकार मंडळींनादेखील हा शो आवडत आहे. याबद्दल अनेक कलाकार मंडळी त्यांची मतं, प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्तही करत आहेत. अशातच दोन मराठी अभिनेत्रींचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि या अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर व सायली संजीव. (Kranti and Sayali watching Bigg Boss Marathi 5)
मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री क्रांती रेडकर आणि सायली संजीवचा ‘बिग बॉस मराठी’ पाहतानाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. क्रांती रेडकर व सायली संजीव या दोन्ही अभिनेत्री काही कामानिमित्त एकत्र बाहेर गेल्या होत्या. यावेळी दोघींनीही चक्क हॉटेलमध्ये बसून, सगळ्या गोष्टी सोडून ‘बिग बॉस मराठी’ चा भाऊचा धक्का हा खास शो पाहण्यास प्राधान्य दिलं. दोघींनी हा भाऊचा धक्का पाहतानाचा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
क्रांती व सायली या व्हिडीओमध्ये असं म्हणत आहेत की, “आम्ही सगळं सोडून ‘बिग बॉस मराठी’चा ‘भाऊचा धक्का’ बघतोय… तो सुद्धा मोबाइलवर लाइव्ह! आणि आमची टीम सी आहे.” या नंतर दोघी ‘बाईऽऽऽ हा काय प्रकार’ हा निक्कीचा लोकप्रिय डायलॉगही म्हणतात. सध्या निक्कीचा ‘बाईऽऽऽ हा काय प्रकार’ डायलॉग सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. दहीहंडीमध्येदेखील डीजेवर अनेक ठिकाणी हा डायलॉग प्रेक्षकांना ऐकायला मिळाला. अशातच आता सायली व क्रांती यादेखील निक्कीच्या या डायलॉगच्या व बिग बॉस मराठीची प्रेमात पडल्या आहेत.
दरम्यान, क्रांती व सायली यांनी एका कार्यक्रमाला एकत्र हजेरी लावल्यानंतर एकेठिकाणी बिग बॉस मराठीचा आनंद घेतला. या व्हिडीओमध्ये दोघांनी भरजरी साड्या नेसलयाचे पाहायला मिळत आहे. सायलीने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तर क्रांतीने वांगी रंगाची साडी परिधान केली आहे. दोघीही या व्हिडीओमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. त्यांच्या या व्हिडीओवर अनेक कलाकार व नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स करत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.