रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“घटस्फोटानंतरही एक्सला लाडाने हाक मारायची अन्…”, कंगना रणौतने आमिर खानला सुनावलं?, म्हणाली, “मी कधीही…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 29, 2024 | 3:34 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kangana ranuat on aamir khan

घटस्फोट घेणाऱ्यांवर कंगना वैतागली

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हे नेहमी चर्चेत असते. आजूबाजूला घडत असलेल्या अनेक प्रकरणांवर ती भाष्य करताना दिसते. सध्या ती अभिनयाबरोबरच राजकारणामध्येदेखील अधिक सक्रिय आहे. मात्र नुकताच तिचा एक नवीन चित्रपट भेटीला येणार आहे. ‘इमर्जन्सी’ हा तिचा नवीन चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटामध्ये तिने देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलरदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तसेच सध्या ती ठीक-ठिकाणी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. (kangana ranuat on aamir khan)

या सगळ्यातच तिची एक मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे. यामध्ये घटस्फोटीत लोक वेगळे झाल्यानंतरही एकमेकांवर प्रेम करताना दिसतात. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये तिने बॉलिवूड अभिनेता आमीर खानवर निशाणा साधला आहे. आमीरने दोन वेळा लग्न केले आणि दोघीपासून त्याने घटस्फोटही घेतला. दरम्यान यावरुनच कंगनाने भाष्य केले आहे.

आणखी वाचा – “सूरजच जिंकावा, बुक्कीत टेंगुळ देऊन…”, घराबाहेर आल्यानंतर इरिनाचा सूरजला फुल्ल सपोर्ट, म्हणाली, “त्याच्या गावी जाणार आणि…”

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

कंगनाने ‘मॅशबेल इंडिया’ला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी तिला विचारलं की, “तू अजूनही तुझ्या एक्सबरोबर संपर्कात आहेस का?”, त्यावर कंगनाने उत्तर दिले की, “मी कधीही माझ्या एक्सच्या संपर्कात राहिले नाही. मी तशा लोकांपैकी नाही जे घटस्फोट होऊनदेखील एक्सला लाडाने हाक मारतात. जर असं करायचं असेल तर वेगळे का झाले? एकत्रच राहिले असते”. कंगनाचे हे वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तसेच नाव न घेता तिने आमीरची खिल्लीदेखील उडवली आहे.

आणखी वाचा – गरोदरपणात लाथेने तुडवलं, लैंगिक शोषण, बाहेर अफेअर्स अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे नवऱ्यावर धक्कादायक आरोप, घटस्फोट घेतल्यानंतर…

आमीरने दोन लग्न केली असून तो पहिल्यांदा रिना दत्ताबरोबर लग्नबंधनात अडकला. त्यांना इरा व जुनैद अशी दोन मुलं देखील आहेत. मात्र काही कारणांमुळे ते २००२ साली एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर २००५ साली तो किरण रावबरोबर लग्नबंधनात अडकला. मात्र २०२१ साली त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतरही आमीरचे दोन्ही पत्नीबरोबर खूप चांगले संबंध आहेत. तसेच कंगनाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, तिचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काही दिवसांपूर्वी ट्रेलर समोर येताच शीख समुदायाने नाराजी व्यक्त करत चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.  

Tags: aamir khandivorcekangna ranaut
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Naga Chaitanya On Wedding

घटस्फोटानंतर नागा चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाची तयारी, थाटामाटात लग्न करण्यास नकार, म्हणाला, "त्या लोकांसाठी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.