शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तब्येत जपा, खंडोबा आपणास…”, शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं भाष्य, म्हणाला, “तुमची मेहनत घेण्याची क्षमता…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 6, 2024 | 3:51 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi director Hemant Dhome on Sharad Pawar's health

"तब्येत जपा, खंडोबा आपणास...", शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं भाष्य, म्हणाला, "तुमची मेहनत घेण्याची क्षमता..."

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सक्रिय राजकारणी म्हणून शरद पवार यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. अशातच लोकसभा २०२४च्या निवडणुका या अगदी तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुका या सर्वांसाठीच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षासाठी ही अस्मितेची लढाई झाली आहे आणि या लढाईत शरद पवार यांचाही अगदी सक्रिय सहभाग पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकांसाठी मतदान हे शेवटच्या काही टप्प्यात आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यासाठी शरद पवारांची बारामतीमध्ये सांगता सभादेखील झाली. पण त्यानंतर शरद पवारांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या २० दिवसांपासून ते प्रचाराच्या कामात स्वत:ला झोकून देऊन काम करत होते. तर, राज्यातील बहुतांश जिल्ह्यात त्यांनी जाहीर सभांमधून जनतेला संबोधित केलं. त्यामुळे निवडणुकीच्या या रणधुमाळीत त्यांची तब्येत बिघडली आहे. त्यांचा घसा बसला असून प्रकृती अस्वास्थेमुळे त्यांना आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. अशातच शरद पवारांच्या प्रकृतीवर आता दिग्दर्शक हेमंत ढोमेने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आदरणीय साहेब…
आपली मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी आम्हा तरूणांना देखील थक्क करणारी आहे…

पण कृपया स्वतःची काळजी घ्या… तब्येत जपा…
खंडोबा आपणांस लवकरात लवकर बरे करो… 🙏🏽 pic.twitter.com/wxhkmQn8bL

— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) May 5, 2024

आणखी वाचा – बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांची चर्चा, ‘जुनं फर्निचर’ व ‘नाच गं घुमा’ने आतापर्यंत किती कमावले?, एकूण कमाई तब्बल…

हेमंत ढोमेने शरद पवारांबद्दलची एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. तसेच या पोस्टद्वारे त्याने शरद पवारांना तबयेतीची काळजी घेण्याची विनंतीही केली आहे.  हेमंतने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) ट्विट करत शरद पवारांच्या प्रकृतीविषयी भाष्य केलं आहे. यामध्ये त्याने म्हटलं आहे की, “आदरणीय साहेब, आपली मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी आम्हा तरुणांनादेखील थक्क करणारी आहे. पण कृपया स्वतःची काळजी घ्या… तब्येत जपा… खंडोबा आपणांस लवकरात लवकर बरे करो.”

आणखी वाचा – “आई-वडिलांच्या पसंतीच्या मुलीशीच लग्न करेन अन्…”, आदेश बांदेकरच्या लेकाने सांगितलं कसं करणार लग्न?, म्हणाला, “कोर्टात जाऊन…”

हेमंतची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्या पोस्टला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. तसेच त्याच्या या पोस्टखाली कमेंट्समध्ये अनेकांनी शरद पवारांना काळजी घेण्याचे आवाहन व विनंती केली आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादात आता शरद पवारांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले आहे.   

Tags: entertainment newshemant dhomemarathi directormarathi entertainment newsMarathi newssharad pawarSharad Pawar Newsमनोरंजन बातमीमराठी दिग्दर्शकमराठी बातमीमराठी मनोरंजन बातमीशरद पवारशरद पवार बातमीहेमंत ढोमे
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Next Post
Bride ex boyfriend attend her wedding and everyone gets shocked video goes viral on social media

Video : लग्न लागतानाच नवरी मुलीचा बॉयफ्रेंड मंडपात आला अन्…; नवऱ्या मुलाशी भांडण, व्हिडीओ तुफान व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.