रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध निर्मात्याची गळफास घेत आत्महत्या, आर्थिक नुकसान की आणखी काही?, पोलिसांकडून तपास सुरु

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 15, 2024 | 3:18 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
producer Soundarya Jagadish death

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध निर्मात्याची गळफास घेत आत्महत्या, आर्थिक नुकसान की आणखी काही?, पोलिसांकडून तपास सुरु

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधून सध्या एक दुखद बातमी समोर येत आहे. कन्नड चित्रपटनिर्माते व बिजनेसमॅन सौंदर्या जगदीश यांनी आत्महत्या केली असून त्यांचा मृत्यू झाला आहे.  याबद्दल त्यांच्या जवळच्या सूत्रांकडून माहिती मिळाली असून त्यावर अधिक तपास सुरु आहे. पीटीआयला दिलेल्या जवळच्या सुत्रांना दिलेल्या माहितीनुसार बंगळुरू येथील महालक्ष्मी लेआऊट येथील आपल्या घरामध्ये आत्महत्या केली आहे. आत्महत्येबद्दल समजताच त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबद्दल काही अपडेट समोर आली आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया. (producer Soundarya Jagadish death )

पीटीआयच्या वृत्तानुसार, जगदीश यांच्या मित्राने पत्रकारांना सांगितले की, “जगदीश यांची आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आम्ही त्यांना रुग्णालयात घेऊन गेलो तेव्हा त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांना कोणत्याही प्रकारची समस्या नव्हती. पण तरीही त्यांनी आत्महत्या का केली? याचे कारण मात्र सांगू शकत नाही”.

आणखी वाचा – ‘या’ क्षेत्रामध्ये कार्यरत आहे सुलेखा तळवलकर यांची लेक, शिक्षणात यश मिळताच आईचा आनंद गगनात मावेना, म्हणाल्या, “सलग दोन वर्ष…”

Shocked and saddened to hear of Soundarya Jagadish sir's sudden passing. His presence in the Kannada film industry will be deeply missed. Sending heartfelt condolences to his family and loved ones 🙏

Om Shanti! pic.twitter.com/BS4DmNzULJ

— Tharun Sudhir (@TharunSudhir) April 14, 2024

मिळालेल्या माहितीनुसार जगदीश यांना बँकेकडून एक नोटिस मिळाली होती. त्यामुळे कदाचित यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असे अंदाज बांधले जात आहेत. त्याबद्दल त्यांच्या मित्राने सांगितले की, “नाही. याचा काहीही संबंध नाही. या प्रकरणाला खूप दिवस झाले. बिजनेससंबंधित समस्या वेगळ्या होत्या. तसेच त्यांना कार्डिक अरेस्टबद्दल मृत्यू झाला ही माहितीदेखील चुकीची आहे असे देखील त्यांच्या मित्राने सांगितले”.

आणखी वाचा – आदित्यने अजयच्या तावडीतून पारूची केली सुटका, सुखरुप घरी आणल्यानंतर अहिल्यादेवी भेटीला, दोघींमध्ये नेमकं काय बोलणं होणार?

ते पुढे म्हणाले की, “त्यांच्याबद्दल समजल्यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात दाखल केले. त्यांनी फास लाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता”. पोलिस याबद्दल आता सखोल तपासणी करत आहेत. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या माहितीनुसार डिसीपी सईदुलु अदावथ यांनी जगदीश यांच्या पत्नीने तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले.

जगदीश यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या घरात ठेवले आहे. तसेच कन्नड निर्माते व दिग्दर्शक थारून सुधीर यांनी श्रद्धांजलीची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “सौंदर्या जगदीश यांच्या अकाली निधनाची बातमी ऐकताच मला धक्का बसला. कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबासाठी माझ्या संवेदना”.

आणखी वाचा – Video : सापालाही येतात केस, व्हिडीओमध्ये दिसले मोठे केस, यामध्ये तथ्य किती?, वैज्ञानिकांचं यामागे म्हणणं काय?

जगदीश हे निर्माते होण्याबरोबरच एक बिल्डर व बिजनेसमॅनदेखील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबमध्ये कलाकार व सहकारी यांच्याबरोबर रात्री उशीरपर्यंत पात्री केल्याने अडचणीत आले होते. त्यामुळे काही काळासाठी पबचा परवानादेखील रद्द करण्यात आला होता.  

Tags: deathkannada producerSoundarya Jagadishsuicide
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Old man marrying a girl of his grand daughter's age is going viral on social media

Video : आजोबांनी नातीच्या वयाच्या मुलीशी केलं लग्न, रोमँटिक व्हिडीओही केला शेअर, नेटकरी म्हणाले, "किती सोमवार केले?"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.