शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

क्रिती खरबंदाच्या होणाऱ्या नवऱ्याचे याआधीही झाले आहे एक लग्न, अन् ‘या’ अभिनेत्रींबरोबर रंगल्या आहेत अफेअर्सच्या चर्चा

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 13, 2024 | 10:52 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Pulkit Samrat has been married and had some affairs before his marriage with Kriti Kharbanda

क्रिती खरबंदाच्या होणाऱ्या नवऱ्याचे याआधीही झाले आहे एक लग्न, अन् ‘या’ अभिनेत्रींबरोबर रंगल्या आहेत अफेअर्सच्या चर्चा

२०२४ या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मनोरंजन विश्वातल्या अनेक कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकले. मराठीसह हिंदी कलाविश्वातदेखील अनेकांनी आपल्या जोडीदाराबरोबर विवाहगाठ बांधली. अशातच आता अभिनेता पुलकित सम्राट व अभिनेत्री क्रिती खरबंदा ही जोडीदेखील लवकरच विवाहबंधनात अडकायला सज्ज झाली आहे. पुलकित व क्रिती येत्या १५ मार्चला लग्नबंधनात अडकणार असून त्यांच्या लग्नाच्या तयारीलाही सुरुवात झाली आहे. त्यांचे लग्न हरियाणातील मानेसर येथे पार पडणार आहे.

पुलकित व क्रिती गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते आणि आखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबी रितीरिवाजांनुसार त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. क्रितीचे हे पहिले लग्न असले तरी पुलकितचे याआधी एक लग्न झाले आहे, पुलकितचे याआधीचे लग्न मोडले असून अनेक अभिनेत्रींबरोबर त्याच्या अफेसर्सच्या चर्चाही रंगल्या आहेत. पुलकित अनेक वर्षांपासून क्रितीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे, पण याआधी अनेक अभिनेत्रींबरोबर त्याचे जोडले गेले आहे.

View this post on Instagram

A post shared by Pulkit Samrat (@pulkitsamrat)

२०१४ मध्ये पुलकित सम्राटने सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिराबरोबर लग्न केले होते. त्यांचा हा प्रेमविवाह होता, मात्र तो केवळ ११ महीनेच टिकला. पुलकित श्वेताच्या विभक्त होण्याचे श्रेय एका अभिनेत्रीला देण्यात आले. काही मीडिया रिपोर्टनुसार यामी गौतमीमुळे त्यांचे लग्न मोडले होते. यामी त्यांच्या आयुष्यात येईपर्यंत सर्व काही ठीक होते. पण २०१५ दरम्यान, पुलकित यामीला डेट करू लागला असा आरोप श्वेता रोहिराने केले होते. मात्र, पुलकितने तिच्या या आरोपांवर कधीही स्पष्टीकरण दिले नाही.

आणखी वाचा – प्रियांका, परिणीतीनंतर चोप्रा घराण्यातील ‘ही’ अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, दिल्लीच्या केजरीवाल कुटुंबाची झाली सून

यामी व पुलकित या दोघांनी ‘सनम रे’, ‘आबरा का डबरा’ व ‘जुनूनियत’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. या तीन चित्रपटांमध्ये पुलकितची यामीबरोबरची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. रिपोर्ट्सनुसार, यादरम्यान पुलकित व यामीचे प्रेम जुळले. मात्र, हे त्यांचे हे नाते फार काळ टिकले नाही आणि यामीबरोबर ब्रेकअप झाल्यानंतरच पुलकितने क्रिती खरबंदाला डेट करायला सुरुवात केली. काही काळ डेट केल्यानंतर आता हे दोघेही लग्न करणार आहेत.

आणखी वाचा – आजचे राशीभविष्य : आज ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार आर्थिक फायदा, तर ‘या’ राशीच्या लोकांसाठी व्यवसायात निर्माण होणार नवीन संधी, जाणून घ्या…

एकता कपूरच्या ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ मालिकेच्या तिसऱ्या भागामध्ये लक्ष्य-केटी यांच्या भूमिका पुलकित सम्राट व मौनी रॉय यांनी साकारल्या होत्या. पुलकित व मौनीला एकता कपूरच्या या मालिकेतून चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. यादरम्यान, दोघे एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती, पण त्यांचेही नंतर ब्रेकअप झाले असल्याचे म्हटले गेले.  

Tags: bollywood actorbollywood actressBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsKriti KharbandaPulkit SamratPulkit Samrat AffairsPulkit Samrat Affairs NewsPulkit Samrat MarriagePulkit Samrat Marriage Newsक्रिती खरबंदापुलकित सम्राटपुलकित सम्राट अफेअर्सपुलकित सम्राट अफेअर्स बातमीपुलकित सम्राट लग्नपुलकित सम्राट लग्न बातमीबॉलिवूड अभिनेताबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड बातमीबॉलिवूड मनोरंजन बातमीमनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Next Post
Thalapathy Vijay on CAA

"आमच्या राज्यात हा कायदा नको", CAA लागू करण्यावर थलपती विजयची केंद्र सरकारवर टीका, सरकारला आवाहन करत म्हणाला…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.