२०२४ या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मनोरंजन विश्वातल्या अनेक कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकले. मराठीसह हिंदी कलाविश्वातदेखील अनेकांनी आपल्या जोडीदाराबरोबर विवाहगाठ बांधली. अशातच आता अभिनेता पुलकित सम्राट व अभिनेत्री क्रिती खरबंदा ही जोडीदेखील लवकरच विवाहबंधनात अडकायला सज्ज झाली आहे. पुलकित व क्रिती येत्या १५ मार्चला लग्नबंधनात अडकणार असून त्यांच्या लग्नाच्या तयारीलाही सुरुवात झाली आहे. त्यांचे लग्न हरियाणातील मानेसर येथे पार पडणार आहे.
पुलकित व क्रिती गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते आणि आखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबी रितीरिवाजांनुसार त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. क्रितीचे हे पहिले लग्न असले तरी पुलकितचे याआधी एक लग्न झाले आहे, पुलकितचे याआधीचे लग्न मोडले असून अनेक अभिनेत्रींबरोबर त्याच्या अफेसर्सच्या चर्चाही रंगल्या आहेत. पुलकित अनेक वर्षांपासून क्रितीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे, पण याआधी अनेक अभिनेत्रींबरोबर त्याचे जोडले गेले आहे.
२०१४ मध्ये पुलकित सम्राटने सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिराबरोबर लग्न केले होते. त्यांचा हा प्रेमविवाह होता, मात्र तो केवळ ११ महीनेच टिकला. पुलकित श्वेताच्या विभक्त होण्याचे श्रेय एका अभिनेत्रीला देण्यात आले. काही मीडिया रिपोर्टनुसार यामी गौतमीमुळे त्यांचे लग्न मोडले होते. यामी त्यांच्या आयुष्यात येईपर्यंत सर्व काही ठीक होते. पण २०१५ दरम्यान, पुलकित यामीला डेट करू लागला असा आरोप श्वेता रोहिराने केले होते. मात्र, पुलकितने तिच्या या आरोपांवर कधीही स्पष्टीकरण दिले नाही.
यामी व पुलकित या दोघांनी ‘सनम रे’, ‘आबरा का डबरा’ व ‘जुनूनियत’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. या तीन चित्रपटांमध्ये पुलकितची यामीबरोबरची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. रिपोर्ट्सनुसार, यादरम्यान पुलकित व यामीचे प्रेम जुळले. मात्र, हे त्यांचे हे नाते फार काळ टिकले नाही आणि यामीबरोबर ब्रेकअप झाल्यानंतरच पुलकितने क्रिती खरबंदाला डेट करायला सुरुवात केली. काही काळ डेट केल्यानंतर आता हे दोघेही लग्न करणार आहेत.
एकता कपूरच्या ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ मालिकेच्या तिसऱ्या भागामध्ये लक्ष्य-केटी यांच्या भूमिका पुलकित सम्राट व मौनी रॉय यांनी साकारल्या होत्या. पुलकित व मौनीला एकता कपूरच्या या मालिकेतून चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. यादरम्यान, दोघे एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती, पण त्यांचेही नंतर ब्रेकअप झाले असल्याचे म्हटले गेले.