शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : भर कार्यक्रमात सुप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, शाहरुख खानच्या पाया पडला अन्…; उपस्थितही भारावले

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 12, 2024 | 11:23 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Atlee touches feet Shahrukh Khan After receiving the award video viral on social media

Video : भर कार्यक्रमात सुप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, शाहरुख खानच्या पाया पडला अन्...; उपस्थितही भारावले

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. ‘जवान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिससह प्रेक्षकांच्या मनात आपले घर निर्माण केले. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान व अभिनेत्री नयनतारा यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली. तर हा चित्रपट दिग्दर्शित करणारा तामिळ दिग्दर्शक ॲटलीचेही विशेष कौतुक झाले. अशातच या चित्रपटासाठी ॲटलीला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. यावेळी पुरस्कार स्वीकारायला जाताना त्यांनी केलेल्या कृतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

रविवारी रात्री मुंबईत झालेल्या ‘झी सिने अवॉर्ड्स २०२४’मध्ये ॲटलीला ‘जवान’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. या सोहळ्याची झलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात ॲटली खूपच उत्साहित दिसत असून त्याच्या चेहऱ्यावर पुरस्कार मिळाल्याचा आनंद स्पष्टपणे दिसत आहे. यावेळी पुरस्कार घ्यायला जाताना ॲटली शाहरुख खानच्या पायाला स्पर्श करतो. यानंतर शाहरुख त्याला मिठी मारून त्याचे अभियनंदन करतो. ॲटली व शाहरुखच्या या व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

View this post on Instagram

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

आणखी वाचा – “जोपर्यंत तुमचा बाप जीवंत आहे तोवर…”, भर पुरस्कार सोहळ्यामध्ये शाहरुख खान बायको व मुलांसाठी भलतंच बोलून गेला अन्…; उपस्थितही चक्रावले

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओखाली अनेकांनी ॲटलीचे कौतुक केले आहे. “तू यासाठी खरोखरचं पात्र आहेस, याला म्हणतात दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील कलाकारांचे संस्कार, मोठ्यांच्या पायांना स्पर्श केला पाहिजे” अशा अनेक कमेंट्स करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहींनी शाहरुखच्या पाया पडण्याची काय गरज होती, तसेच या चित्रपटाला पुरस्कार कसा काय मिळाला?” असं म्हणत नकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – “याचा फोन फोडू का मी…”, फोटोग्राफरवर का भडकली सई ताम्हणकर?, व्हिडीओ होतोय व्हायरल

दरम्यान, या चित्रपटात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत दिसला होता. तसेच त्याच्यासह नयनतारा, दीपिका पादुकोण, प्रियामणी, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा, लहार खान, गिरीजा ओक आणि संजीता भट्टाचार्य आदी कलाकारही होते. या चित्रपटाने जगभरात सुमारे ११६० कोटी रुपयांची कमाई केली होती.

Tags: Atleebollywood actorBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsshah rukh khanTamil Directorॲटलीतामिळ दिग्दर्शकबॉलिवूड अभिनेताबॉलिवूड बातमीबॉलिवूड मनोरंजन बातमीमनोरंजन बातमीशाहरुख खान
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Next Post
Katrina Kaif On Pregnancy Rumours

गरोदर असल्याच्या चर्चांना कतरिना कैफने दिला पूर्णविराम, हटके व फिट अंदाजात दिसली अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.