बॉलिवूडचा किंग शाहरुख खान हा त्याच्या चित्रपटांमुळे नेहमी चर्चेत असतो. तो त्याच्या अभिनयाबरोबरच त्याचा विनम्र स्वभाव, त्याचे व्यक्तीमत्त्व याचीही चर्चा होत असते. मागील वर्षी ‘जवान’, ‘पठाण’, ‘डंकी’ या चित्रपटांनी चांगलीच कमाई केली आहे. त्याच्या चित्रपटाची चर्चा ही देशातच नाही तर जगभरात होत असते. देशाबाहेरही त्याचे अनेक चाहते आहेत. १९८८ मध्ये शाहरुखने ‘फौजी’ या मालिकेतून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर १९८२ साली दिव्या भारतीबरोबर ‘दिवाना’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर शाहरुखने मागे वळून पाहिले नाही. नुकताच शाहरुखचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये तो आपल्या मुलांसाठी काही बोलताना दिसत आहे. (Shahrukh khan on childrens)
एका पुरस्कार सोहळ्यादरम्यानचा शाहरुखचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यावेळी त्याला ‘जवान’ व ‘पठाण’ या चित्रपटांना अनेक श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाले आहेत. ‘जवान’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट VFX व सर्वोत्कृष्ट ॲक्शनसाठी पुरस्कार मिळाले. तसेच ‘पठाण’साठी दोन पुरस्कार मिळाले. अरिजित सिंह व शिल्पा राव यांना गाण्यांसाठी पुरस्कार मिळाला. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.
यादरम्यान पुरस्कार घेताना शाहरुख भावनिक झालेला दिसून आला आणि त्याने भाषणही केले. या भाषणामध्ये त्याने आपला पुरस्कार हा पत्नी गौरी व मुलांना समर्पित केला आहे. तसेच आपल्या मुलांसाठी सांगितले की, “हा मेसेज माझ्या मुलांसाठी व पत्नीसाठी आहे. जोपर्यंत तुमचा बाप जीवंत आहे, तोपर्यंत मनोरंजन होत राहील”.
आणखी वाचा – दिग्दर्शक सूर्य किरण यांचे निधन, वयाच्या ५१ व्या वर्षी ‘या’ गंभीर आजाराने मृत्यूला गाठलं अन्…
काही माहिन्यांपूर्वी शाहरुखचा मुलगा अयान हा अडचणीत सापडला होता. त्यावेळी एक बाप म्हणून शाहरुखने आपले कर्तव्य पार पाडले होते. यावरुन त्याचे समाजमाध्यमांमध्ये अधिक कौतुक केले होते. मुलगी सुहानानेदेखील झोया अख्तरच्या ‘आर्चीस्’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आता ती शाहरुखबरोबरच एक जाहिरात करताना दिसली. या जाहिरातीला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. ‘पठाण’च्या यशानंतर आता ‘पठाण २’ या चित्रपटामध्ये दिसणार असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.