शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

महिलांच्या शर्टाची बटणं डावीकडे तर पुरुषांच्या शर्टाची बटणं उजवीकडे का असतात?, फॅशन नव्हे तर ‘ही’ आहेत महत्त्वाची कारणं

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 5, 2024 | 5:36 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
women shirt buttoned on the left and men shirt buttoned on the right, why? Know the reason

महिलांच्या शर्टाची बटणं डावीकडे तर पुरुषांच्या शर्टाची बटणं उजवीकडे का असतात?, फॅशन नव्हे तर ‘ही’ आहेत महत्त्वाची कारणं

हल्ली फॅशन ही लिंगावर आधारित नसून कुणाला कोणते व कसे कपडे परिधान करायचे आहेत यावर अवलंबून आहे आणि बदलत्या काळापासून फॅशनचे अनेक ट्रेंडही बदलत आले आहेत. सुरुवातीला फक्त पुरुष शर्ट घालत होते. मात्र आता महिलादेखील शर्ट घालताना दिसतात. पण, महिला व पुरुषांच्या शर्टमध्ये एक मोठा फरक आहे. तो म्हणजे पुरुषांच्या शर्टला उजवीकडे बटण असतात तर महिलांच्या शर्टला डावीकडे. पण तुम्हाला माहीत आहे का हे फॅशनसाठी केले जात नसून त्यामागे अनेक कारणे आहेत. चला तर जाणून घेऊयात याबद्दलचे नेमके कारण…

पूर्वीच्या काळी नवनवीन प्रकारचे कपडे बनवले जात असत, तेव्हा स्त्रियांचे कपडे अतिशय क्लिष्ट प्रकारचे होते आणि ते त्यांना परिधान करणे फार कठीण होते. म्हणूनच पुरुष त्यांचे कपडे स्वतः परिधान करत असत, परंतु स्त्रियांना कपडे घालण्यासाठी नोकरांची आवश्यकता भासत असे. त्यामुळे नोकरांना आपल्या मालकिणींना कपडे परिधान करताना उजव्या हाताने चुकीच्या दिशेने असलेली बटणे बंद करणे त्यांच्यासाठी सोयीचे होते.

तसेच, स्त्रिया आपल्या बाळाला स्तनपान करताना त्यांच्या डाव्या हातात धरतात आणि उजव्या हाताने काही इतर कामेदेखील करतात. त्यामुळे उजव्या हाताने बटण उघडता यावे म्हणून शर्टाचे बटण डाव्या बाजूला ठेवले होते. याशिवाय, एक सामान्य सिद्धांत असा आहे की जेव्हा महिलांचे शर्ट बनवण्यास सुरुवात झाली तेव्हा त्यांना पुरुषांच्या शर्टपेक्षा वेगळे करण्यासाठी स्त्रियांच्या शर्टची बटणे डाव्या बाजूला ठेवली गेली.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडितची मोठी घोषणा, आता हिंदी निर्मात्यांसह करणार मराठी चित्रपटाची निर्मिती

शर्टचा नेपोलियन बोनापार्टशीही संबंध लावला जातो. नेपोलियनने महिलांच्या शर्टची बटणे डावीकडे असावीत असा आदेश दिला होता. कथेनुसार, नेपोलियन नेहमी त्याच्या शर्टमध्ये एक हात ठेवत असे. अनेक महिला त्याचे अनुकरण करु लागल्या. त्याचे अनुकरण करण्यासाठी, नेपोलियनने महिलांच्या शर्टमध्ये अधिक बटणे जोडण्याचे आदेश जारी केले होते. अर्थात याचा कोणताही ठोस पुरावा नाही. परंतु, काही कथांच्या आधारे लोक ते खरे असल्याचे मानतात.

आणखी वाचा – गलिच्छ भाषा, शिवीगाळ अन्…; कपिल शर्माच्या नव्या शोचा प्रोमो पाहून भडकला सुनिल पाल, सुनावले खडेबोल, म्हणाला, “लायकीही नाही की…”

त्याचबरोबर प्राचीन काळी पुरुष युद्धात जात असताना उजव्या हातात तलवार धरत असत. त्यांची तलवार डाव्या बाजूला टांगलेली होती आणि ती बाहेर काढण्यासाठी त्यांचा उजवा हात वापरला जात होता. त्यामुळे डाव्या हाताने ती सहज उघडता यावीत म्हणून बटणे उजव्या बाजूला ठेवली गेली.

Tags: entertainment newsmarathi entertainment newsMarathi newsMen ShirtMen Shirt Button RightWomen ShirtWomen Shirt Button Leftपुरुष शर्टपुरुष शर्ट बटण उजवीकडेमनोरंजन बातमीमराठी बातमीमराठी मनोरंजन बातमीमहिला शर्टमहिला शर्ट बटण डावीकडे
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Bollywood Celebrities Follow Hindu Religion

कोणी गणपती बाप्पा तर कोणी शंकर महादेवाचे भक्त; मुस्लिम असूनही 'या' सुप्रसिद्ध सेलिब्रिटींना आहे हिंदू देवतांची पूजा करण्याचं वेड

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.