सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गलिच्छ भाषा, शिवीगाळ अन्…; कपिल शर्माच्या नव्या शोचा प्रोमो पाहून भडकला सुनिल पाल, सुनावले खडेबोल, म्हणाला, “लायकीही नाही की…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 5, 2024 | 4:33 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Sunil Pal posted a video and criticized Kapil Sharma show after realizing promo

गलिच्छ भाषा, शिवीगाळ अन्...; कपिल शर्माच्या नव्या शोचा प्रोमो पाहून भडकला सुनिल पाल, सुनावले खडेबोल, म्हणाला, "लायकीही नाही की..."

विनोदी अभिनय क्षेत्रातील एक लोकप्रिय नाव म्हणजे सुनिल पाल. सुनिल पाल यांनी आजवर त्यांच्या अनेक विनोदी प्रहसनांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांच्या विनोदी सादरीकरणाचे देशभरात अनेक चाहते आहेत. सुनिल पाल त्यांच्या विनोदी अभिनयासह सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. अशातच त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत ‘कपिल शर्मा शो’वर टीका केली आहे.  

छोट्या पडद्यावर ‘द कपिल शर्मा शो’ने आतापर्यंत प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. अशातच आता कपिल शर्माचा हा कॉमेडी शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या शोद्वारे सुनिल ग्रोव्हर व कपिल शर्मा मोठ्या कालावधीनंतर एकत्र काम करणार आहेत. नुकताच या शोचा प्रोमो शेअर करण्यात आला असून सुनिल पाल यांनी या प्रोमोवर नाराजी व्यक्त केली आहे. हा प्रोमो अतिशय वाईट असून कपिल शर्माने कॉमेडीला वाचवावं असं सुनिल पाल यांनी म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Sunil Pal Comedian (@sunilpalcomedian)

याच संबंधित एक व्हिडीओ पोस्ट करत सुनिल पाल यांनी असं म्हटलं आहे की, “कपिल शर्माने शेअर केलेले नेटफ्लिक्स शोचे प्रोमोज पाहून मी खूप निराश झालो आहे. कपिल शर्मा हा कॉमेडीचा सुपरस्टार आहे. तो कॉमेडीचा बादशाह आहे. प्रत्येक घराघरात त्याचा शो कौटुंबिक मनोरंजनासाठी बघितला जातो. पण आता त्याचा नवा शो ओटीटीवर येत आहे. त्याचा प्रोमो गलिच्छ असून त्यात अनेक वाईट शब्दांचा वापर होत आहे. मला वाटतं इथे कॉमेडीचा बादशाह पराभूत होईल आणि मी माझा बादशाह पराभूत होताना पाहू शकत नाही”.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडितची मोठी घोषणा, आता हिंदी निर्मात्यांसह करणार मराठी चित्रपटाची निर्मिती

यापुढे त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “तुझ्या वागण्या-बोलण्याप्रमाणेच तुझा विनोदही अगदीच निर्मळ आहे. कपिल मी तुझा खूप मोठा चाहता आहे. जे सुरू आहे ते तुम्हाला थांबवावे लागेल, तुम्ही खरे कॉमेडियन आहात. त्यामुळे मी हात जोडून विनंती करतो, असे करू नका. तुमचे चाहते कुटुंबातील सदस्य आहेत, त्यांच्यासाठी चांगली कॉमेडी करा. मला बाकी लोकांकडून काहीच अपेक्षा नाही. तुमच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांची तुमच्याबरोबर उभं राहण्याची लायकीही नाही. ते तुमच्या बरोबरीचे नाहीत. त्यामुळे तुम्ही याकडे जातीने लक्ष द्या आणि तुम्ही आजवर जशी कॉमेडी करत आलात तशीच यापुढेही करा”.

आणखी वाचा – “माझ्या वागण्यामुळे सगळे पक्ष संपतील”, राजकारणात प्रवेश करण्यावरुन नाना पाटेकरांचं बेधडक वक्तव्य, म्हणाले, “अमर असल्यासारखे वागतात आणि…”

दरम्यान, नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ येत्या ३० मार्चपासून प्रसारीत होणार आहे. या शोमध्ये कपिलबरोबर सुनील ग्रोव्हर, अर्चना पुरण सिंह, कृष्णा अभिषेक, कीकू शारदा, राजीव ठाकूर आदी कलाकारही दिसणार आहे. 

Tags: सुनील पालमनोरंजन बातमीमराठी मनोरंजन बातमीमराठी बातमीकपिल शर्माद कपिल शर्मा शोविनोदी अभिनेताविनोदी कार्यक्रमcomedianComedy Showsentertainment newskapil sharmamarathi entertainment newsMarathi newsSunil Palthe kapil sharma show
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Kangana Ranaut On Ambani Pre Wedding

"कधीच कोणाच्या लग्नात नाचले नाही", अंबानींच्या पार्टीत सेलिब्रिटींचा डान्स पाहून कंगना रणौतची टीका, स्वतःची लता मंगेशकरांशीही केली तुलना

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.