मराठी सिनेसृष्टीतील एक सुंदर व उत्तम अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडितचे नाव अग्रगण्य आहे. तेजस्विनीने चित्रपटांपासून वेबसीरिजपर्यंत सर्वच क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला आहे. तिचा चाहता वर्गदेखील मोठा आहे. त्याचबरोबर अभिनयासह निर्मिती क्षेत्रातही तिची चांगलीच कारकीर्द चालू आहे. त्यामुळे सर्वजण तेजस्विनीच्या आगामी प्रोजेक्ट्सची आतुरतेने वाट पाहात असतात. अशातच तेजस्विनीने निर्मिती क्षेत्रात आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. (Tejaswini Pandit On Instagram)
तेजस्विनी लवकरच एक भव्यदिव्य कलाकृती घेऊन चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. ती बॉलिवूडमध्ये अनेक दर्जेदार चित्रपट देणाऱ्या साजिद नाडियाडवाला एंटरटेनमेंटबरोबर निर्मिती करत आहे. याबद्दल आपला आनंद व्यक्त करताना निर्मात्या वर्धा नाडियाडवालांनी असं म्हटलं आहे की, ” मराठी चित्रपटांसाठी सह्याद्री फिल्मबरोबर भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. माझे या भूमीशी, संस्कृतीशी आणि भाषेशी विशेष नातं आहे. हे आमचे घर आहे. त्यामुळं हे चित्रपट माझ्यासाठी खूप खास असतील”.
यापुढे त्यांनी तेजस्विनीचं कौतुक करत असं म्हटलं आहे की, “तेजस्विनीबरोबर आम्ही आमच्या या नवीन प्रवासाला सुरुवात करत आहोत. तेजस्विनी एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे तिच्याबरोबर आम्ही प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो आणि यासाठी आम्हाला प्रेक्षकांचे प्रेम आणि सहकार्य गरजेचं आहे.” तर तेजस्विनीनेदेखील तिच्या भावना व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “वर्धा, माझ्यावर हा विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. अजून वाट पाहू शकत नाही. खूपच आनंदी आहे”.
आणखी वाचा – “सगळेच नशा करत असल्याचं तिने…”, इमरान हाश्मीने कंगना रणौतला चांगलंच सुनावलं, म्हणाला, “ती एवढी आक्रमक…”
दरम्यान, या पोस्टखाली बॉलिवूडसह मराठी कलाविश्वातीलही अनेक कलाकार मंडळींनी कमेंट्सद्वारे कौतुक केले आहे. भाग्यश्री मोटे, सुयश टिळक, पीयूष रानडे आदी कलाकारांनी कमेंट्सद्वारे तिचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर तेजस्विनीच्या अनेक चाहत्यांनीही तेजस्विनीला तिच्या निर्मिती क्षेत्रातील या नवीन भरारीसाठी कमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.