हल्ली फॅशन ही लिंगावर आधारित नसून कुणाला कोणते व कसे कपडे परिधान करायचे आहेत यावर अवलंबून आहे आणि बदलत्या काळापासून फॅशनचे अनेक ट्रेंडही बदलत आले आहेत. सुरुवातीला फक्त पुरुष शर्ट घालत होते. मात्र आता महिलादेखील शर्ट घालताना दिसतात. पण, महिला व पुरुषांच्या शर्टमध्ये एक मोठा फरक आहे. तो म्हणजे पुरुषांच्या शर्टला उजवीकडे बटण असतात तर महिलांच्या शर्टला डावीकडे. पण तुम्हाला माहीत आहे का हे फॅशनसाठी केले जात नसून त्यामागे अनेक कारणे आहेत. चला तर जाणून घेऊयात याबद्दलचे नेमके कारण…
पूर्वीच्या काळी नवनवीन प्रकारचे कपडे बनवले जात असत, तेव्हा स्त्रियांचे कपडे अतिशय क्लिष्ट प्रकारचे होते आणि ते त्यांना परिधान करणे फार कठीण होते. म्हणूनच पुरुष त्यांचे कपडे स्वतः परिधान करत असत, परंतु स्त्रियांना कपडे घालण्यासाठी नोकरांची आवश्यकता भासत असे. त्यामुळे नोकरांना आपल्या मालकिणींना कपडे परिधान करताना उजव्या हाताने चुकीच्या दिशेने असलेली बटणे बंद करणे त्यांच्यासाठी सोयीचे होते.
तसेच, स्त्रिया आपल्या बाळाला स्तनपान करताना त्यांच्या डाव्या हातात धरतात आणि उजव्या हाताने काही इतर कामेदेखील करतात. त्यामुळे उजव्या हाताने बटण उघडता यावे म्हणून शर्टाचे बटण डाव्या बाजूला ठेवले होते. याशिवाय, एक सामान्य सिद्धांत असा आहे की जेव्हा महिलांचे शर्ट बनवण्यास सुरुवात झाली तेव्हा त्यांना पुरुषांच्या शर्टपेक्षा वेगळे करण्यासाठी स्त्रियांच्या शर्टची बटणे डाव्या बाजूला ठेवली गेली.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडितची मोठी घोषणा, आता हिंदी निर्मात्यांसह करणार मराठी चित्रपटाची निर्मिती
शर्टचा नेपोलियन बोनापार्टशीही संबंध लावला जातो. नेपोलियनने महिलांच्या शर्टची बटणे डावीकडे असावीत असा आदेश दिला होता. कथेनुसार, नेपोलियन नेहमी त्याच्या शर्टमध्ये एक हात ठेवत असे. अनेक महिला त्याचे अनुकरण करु लागल्या. त्याचे अनुकरण करण्यासाठी, नेपोलियनने महिलांच्या शर्टमध्ये अधिक बटणे जोडण्याचे आदेश जारी केले होते. अर्थात याचा कोणताही ठोस पुरावा नाही. परंतु, काही कथांच्या आधारे लोक ते खरे असल्याचे मानतात.
त्याचबरोबर प्राचीन काळी पुरुष युद्धात जात असताना उजव्या हातात तलवार धरत असत. त्यांची तलवार डाव्या बाजूला टांगलेली होती आणि ती बाहेर काढण्यासाठी त्यांचा उजवा हात वापरला जात होता. त्यामुळे डाव्या हाताने ती सहज उघडता यावीत म्हणून बटणे उजव्या बाजूला ठेवली गेली.