भारत आणि आपली भारतीय संस्कृती जगात नावाजली जाते. जगभरातून अनेक लोक ही संस्कृती पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी भारतात येत असतात. भारतीय संस्कृतीची एक खासियत म्हणजे केवळ भारतात सर्वधर्म समभाव या भावनेने प्रत्येक जण प्रत्येक धर्मातील संस्कृती जपताना पाहायला मिळतो.
या गोष्टीचं उत्तम उदाहरण म्हणजे बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकार आणि त्यांची प्रत्येक धर्माप्रती असलेली श्रद्धा.(Bollywood Celebrities Follow Hindu Religion)
बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या धर्मासह भारतातातील प्रत्येक धर्मातील सण उत्सव तितक्याच श्रद्धेने, भक्तीने साजरे करताना दिसतात. पाहुयात मुस्लिमअसून देखील पूजा, अर्चना करणारे बॉलीवूडमधील काही कलाकार आणि त्यांचे काही खास फोटो. अभिनेता शाह रुख खान काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासह पंजाब येथील गोल्डन टेम्पल येथे दर्शनासाठी गेला होता तर, भाईजान म्हणून ओळख असलेला दबंग अभिनेता प्रत्येक गणपती उत्सवात बाप्पाच्या आरतीमध्ये मंत्रमुग्ध होताना दिसतो.
सलमान, शाह रुख खान यांच्यासह सैफअली खान, करीना कपूर, अभिनेत्री सारा अली खान हे कलाकार देखील गणपती, दिवाळी साजरी करताना पाहायला मिळतात.सैफअली खानच्या घरातील देवाची पूजा करतानाचा फोटो चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. तर केदारनाथ चित्रपटाप्रमाणे खऱ्या आयुष्यातही अभिनेत्री सारा अली खान महादेवांच्या भक्तीत दंग होताना दिसते. काही दिवसांपूर्वी साराने उज्जैन येथील महाकाल मंदिरात जाऊन पूजापाठ केला होता.(Bollywood Celebrities Follow Hindu Religion)
बॉलीवूडमधील लाडकी जोडी म्हणजे कॅटरिना कैफ-विकी कौशल यांचा देखील बाप्पाची पूजा करतानाचा फोटो व्हायरल झाला होता. तसेच अयोध्या येथे राम मंदिरांच्या स्थापनेला देखील या जोडीने उपस्थिती दर्शवली होती. बॉलीवूड अभिनेत्री सोहा अली खानच्या घरी देखील दरवर्षी बाप्पाचे मोठ्या थाटामाटात आगमन केले जाते. केवळ बॉलीवूडच नाही तर प्रत्येक धर्मातील सण, उत्सव प्रत्येकजण मोठ्या उत्साहात साजरे करत असतो. गणपती, दिवाळी असो वा ईद किंवा क्रिसमस प्रत्येक सणाला भारतात समान महत्व दिलं जातं