शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : करीना कपूरचा लेक भलताच खट्याळ, जीभ काढून कॅमेऱ्यामॅनलाच चिडवून दाखवलं, आई हात धरुन खेचू लागली अन्…; व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 4, 2024 | 11:30 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Kareena kapoor son Jeh made a funny face while they left Jamnagar video viral on social media

Video : करीना कपूरचा लेक भलताच खट्याळ, जीभ काढून कॅमेऱ्यामॅनलाच चिडवून दाखवलं, आई हात धरुन खेचू लागली अन्...; व्हिडीओ व्हायरल

गेले काही दिवस सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये एकच चर्चा रंगली होती, ती म्हणजे अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनची. अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. यानिमित्ताने १ ते ३ मार्चपर्यंत या प्री-वेडिंग फंक्शन्सचे आयोजन करण्यात आले होते. अशातच नुकतीच काल (३ मार्च) रोजी या भव्य कार्यक्रमाची सांगता झाली. त्यामुळे सगळे कलाकार आपली घराकडे कूच करत आहेत.

अशातच सोशल मीडियावर करीना कपूर व सैफ अली खान यांचा मुलगा जेहचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जेहच्या चेहऱ्यावर आगळेवेगळे भाव असल्याचे दिसत आहे. करीना कपूर त्याचा हात पकडून त्याला घेऊन जाण्याच्या प्रयत्न करताना दिसत आहे, मात्र जेहला अतियहुन जायचे नसल्याचे या व्हिडीओवरुण कळत आहे. त्यामुळे जेहचा हा अंदाज पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओखाली अनेक भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा – कानपूरच्या वैभव गुप्ताने पटकावलं ‘इंडियन आयडल १४’चे विजेतेपद, आकर्षक ट्रॉफीसह मिळाले तब्बल इतके रुपये, अलिशान कार अन्…

या व्हिडीओखाली एकाने असं म्हटलं आहे की, “जेह म्हणत असेल ही यांची रोजची काय नाटकं आहेत” तर आणखी एकाने असं म्हटलं आहे की, “जेह खरोखरच वैतागला आहे वाटतं”. तसेच अनेकांनी “इन्स्टाग्राम सुरु करताच जामनगरला पोहोचलो असं वाटतं आहे. आम्ही अंबानी अॅप् डाउनलोड केलं आहे की काय असं वाटत आहे. काहीही म्हणा जेह खूपच क्युट आहे. शेवटी एकदाचे हे कार्यक्रम संपले.” अशा भन्नाट कमेंट्स करत या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद दिला असल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – ‘अच्छा तो हम चलते है’, धर्मेंद्र यांच्या ‘त्या’ पोस्टने वेधले लक्ष, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

दरम्यान, १ तारखेपासून ३ तारखेपर्यंत चाललेल्या या भव्य कार्यक्रमात बॉलिवूड, हॉलिवूड, राजकीय, कला तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. करीना व सैफने दिलजीत दोसांझबरोबर स्टेजवर सादरीकरण केले, तर शाहरुख, सलमान व  आमिर खान यांनीही या कार्यक्रमात नाटू नाटू या गाण्यावर चांगलाच ठेका धरला.   

Tags: bollywood actressBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsJehkareena kapoorकरीना कपूरजेहबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड बातमीबॉलिवूड मनोरंजन बातमीमनोरंज बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Aishwarya Rai Daughter Aaradhya Bachchan

Video : ऐश्वर्या राय बच्चनच्या लेकीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून सगळेच चक्रावले, हुबेहुब आईसारखी दिसत आहे आराध्या बच्चन, इतका झाला आहे बदल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.