माणसाचे वय वाढणे हे जितकं साहजिक आहे, त्याचप्रमाणे वाढत्या वयाबरोबर शरीरासंबंधित काही आजारही आपले डोके वर काढू लागतात. असंच काहीसं ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्याबद्दल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकताच अभिनेते धर्मेंद्र यांचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यात ते मध्यरात्री भूक लागली म्हणून हातात पोळी व तूप घेऊन खात असल्याचे पहायला मिळाले. त्यांच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. अशातच त्यांचा आणखी एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामुळे साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
धर्मेंद्र यांनी त्यांच्या एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या जुन्या चित्रपटातील एका सीनचा फोटो पोस्ट केला आहे आणि या फोटोसह त्यांनी लिहिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोबरोबर धर्मेंद्र यांनी “अच्छा तो हम चलते हैं।”, असं लिहिलं आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच त्यांची ही पोस्ट पाहून अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
Achha to hum chalte hai……. pic.twitter.com/4GMZg0O2AP
— Dharmendra Deol (@aapkadharam) March 2, 2024
आणखी वाचा – ‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाण व सौरभ चौघुले अडकले लग्नबंधनात, साध्या लूकची चर्चा, फोटो व्हायरल
धर्मेंद्र यांच्या अशा पोस्टमुळे त्यांच्या त्यांना नेमकं काय झालं असावं याचा नेमका अंदाज बांधणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक चाहतेमंडळी कमेंट्समध्ये अभिनेत्याच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. अनेकजण कमेंट करत नेमकं काय झालं असावं याबद्दल वारंवार विचारणार करत आहेत. तसेच धर्मेंद्र यांची तब्येत तर ठीक आहे ना?, असा सवालही उपस्थित केला जातो आहे. शिवाय अनेकांनी तब्येतीची काळजी घेण्यासाठीही सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांच्या निरोगी आयुष्यासाठीही चाहतेमंडळी प्रार्थना करत आहेत.
आणखी वाचा – Video : जबरदस्त डान्स अन् कलाकारांचा दंगा, तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेच्या संगीत सोहळ्याचा Inside Video
दरम्यान, वयाच्या ८८व्या वर्षीही धर्मेंद्र चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. अलीकडेच ते शाहिद कपूर-क्रिती सेनॉन यांच्या ‘तेरी बातों मै ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात झळकले होते आणि त्याआधी रणवीर सिंह व आलिया भट्ट यांच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातही त्यांनी काम केले होते. त्यामुळे वयाच्या ८८व्या वर्षीही त्यांनी केलेल्या अभिनयाचे चाहत्यांकडून विशेष कौतुक होत आहे.