शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पितळेची भांडी, हाताने विणलेल्या वस्तू अन्…; पूजा सावंतच्या लग्नातील रुखवत तुम्ही पाहिलात का?, अगदी साध्या पण सुंदर वस्तूंनी वेधलं लक्ष

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 29, 2024 | 5:12 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Pooja Sawant rukhvat photo viral on social media see the details

पितळेची भांडी, हाताने विणलेल्या वस्तू अन्...; पूजा सावंतच्या लग्नातील रुखवत तुम्ही पाहिलात का?, अगदी साध्या पण सुंदर वस्तूंनी वेधलं लक्ष

सध्या मनोरंजन सृष्टीत सर्वत्र लग्नाचा माहोल सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठी सिनेसृष्टीतील कलरफूल अभिनेत्री पूजा सावंत ही नुकतीच सिद्धेश चव्हाणबरोबर विवाहबंधनात अडकली. काल (२८ फेब्रुवारी) रोजी दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. या शाही विवाहसोहळ्याचे काही खास क्षण पूजाने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत.

पूजाने तिच्या लग्नासाठी पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तसेच या साडीवर तिने परिधान केलेल्या पारंपरिक दागिन्यांनी, हातातील हिरव्या चुड्याने व नाकातील नथीने तिचं सौंदर्य आणखीनंच खुलून आलं होतं. तर सिद्धार्थने लग्नासाठी खास पांढऱ्या रंगाची शेरवानी व त्यावर डिझाइनर पांढऱ्या रंगाची शाल परिधान केली होती. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून या फोटोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तर या सगळ्यात सोशल मीडिया आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. तो म्हणजे पूजाच्या रुखवताचा.    

आणखी वाचा – Video : हनिमूनबाबत विचारताच प्रसिद्ध अभिनेत्यावर भडकली गायिका, चालू शोमध्ये कानाखाली मारु लागली अन्…; संपूर्ण प्रकरण कॅमेऱ्यात कैद

नवरीला सासरी पाठवताना लग्नाचे दागिने, कपडे, भेटवस्तू या सर्व खरेदीबरोबरच रुखवत देण्याचीही प्रथा आहे. लग्नाच्या मंडपात एका बाजूला हे रुखवत मांडलेलं असतं. या वस्तूंमध्ये गृह सजावटीच्या वस्तू, गृहोपयोगी वस्तू, काही खाद्य पदार्थ सजवून ठेवलेले असतात. घर सजावटीच्या आणि वापरातील वस्तूंचा संग्रह म्हणजे रुखवत. रुखवत हे नवरीला माहेरच्या मंडळींकडून दिले जाते.  

आणखी वाचा – लग्नानंतर बायकोसह पुण्यातील ‘या’ ठिकाणी फिरायला गेला प्रथमेश परब, फोटोही केला शेअर, म्हणाला, “थोडासा वेळ काढून…”

असंच रुखवत पूजालाही देण्यात आले असून या रुखवतामध्ये पितळेची व मातीची भांडी, गोड खाद्यपदार्थ, शोभेच्या काही वस्तू, पेंटींग्स, गुढी, बैलगाडी, डोली, सप्तपदी यासह हाताने विणलेल्या अनेक गोष्टीही पाहायला मिळत आहेत. तसेच पूजाच्या या रुखवतामध्ये पूजाच्या व नवऱ्याच्या पेटींगने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, पूजा व सिद्धेशच्या लग्नाच्या फोटोसह रुखवतालादेखील चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.     

Tags: marathi actressmarathi entertainment newsMarathi newspooja sawantPooja Sawant Marriage Marathi NewsPooja Sawant Marriage Newssiddesh chavanपूजा सावंतपूजा सावंत लग्न बातमीपूजा सावंत लग्न मराठी बातमीमराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजन बातमीसिद्धेश चव्हाण
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Balika Vadhu actor

कुठे गायब आहेत 'बालिका वधू'मधील आनंदीचे वडील, आता त्यांची परिस्थिती काय?, करतात 'हे' काम अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.