टेलिव्हिजनवरील हिंदी मालिका ‘बालिका वधू’ या मालिकेने खूप वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. या मालिकेतील प्रत्येक पात्रं हे आजही सर्वांच्या लक्षात आहेत. मालिकेतील मूळ पात्र आनंदीपासून ते तिची आई भगवती, खजान सिंह,भैरो सिंह, कल्याणी देवी, जगदीश अशा अनेक भूमिका प्रेक्षकांना आजही जवळच्या वाटतात. २००८ ते २०१६ पर्यंत या मालिकेने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. पण मधल्या काळामध्ये आजीची भूमिका साकारणाऱ्या सुरेखा सिकरी, आनंदीची भूमिका साकारणारी प्रत्युषा बॅनर्जी व शिवची भूमिका साकारणारा सिद्धार्थ शुक्ला यांनी जगाचा निरोप घेतला. पण आनंदीच्या वडिलांची भूमिका साकारणारे चैतन्य आदीब यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. चैतन्य हे केवळ अभिनेते नसून त्यांनी आपल्या आवाजाने हॉलिवूडपर्यंत आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. पण सध्या ते काय करत आहेत याबद्दल आता जाणून घेऊया. (Balika Vadhu actor)
चैतन्य हे ‘बालिका वधू’ या मालिकेमुळे अधिक चर्चेत आले. मूळचे राजस्थानमधील उदयपुरचे असेलेले चैतन्य यांनी आपले शालेय व महाविद्यालयीन शिक्षण उदयपूरमध्येच पूर्ण केले. त्यानंतर आपले नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आले. मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांचा संघर्ष सुरू झाला. सुरुवातीला त्यांनी मित्रांच्या सांगण्यावरुन व्हॉईस डबिंगचे काम करण्यास सुरुवात केली असल्याचे त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. सर्वात आधी त्यांनी १९७३ मध्ये इंग्लिश टीव्ही सीरिज ‘द यंग अँड द रेस्टलेस’साठी आपला आवाज दिला.
या कामामध्ये त्यांची आवड निर्माण झाली. नंतर त्यांनी दाक्षिणात्य चित्रपट ‘मिर्ची’ या चित्रपटामध्ये प्रभाससाठी आवाज दिला. आतापर्यंत चैतन्य यांनी प्रभाससह व्यंकटेश,प्रभूदेवा,कार्तिक व विजय यांना आपला आवाज दिला आहे. हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरच त्यांनी हॉलिवूडमधील ‘बॅटमॅन’, ‘लुसिफर’ व ‘ड्रॅक्युला’ या चित्रपटांमधील मुख्य भूमिकांना आपला आवाज दिला आहे.
आपल्या जादुई आवाजाने आतापर्यंत त्यांनी अनेक पात्र अजरामर केली आहेत. मालिकांमध्ये अभिनय करण्याव्यतिरिक्त त्यांनी रामगोपाल वर्मांच्या ‘रक्त चरित्र’मध्ये तसेच ‘मुंबई सेंट्रल’ या चित्रपटांमध्ये दिसून आले होते. २०२३ मध्ये ‘तुलसीधाम के लड्डू गोपाल’मध्ये ते शेवटचे दिसले होते.