मालिकाविश्वातील काही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे दिव्या अग्रवाल. दिव्याने ‘स्पिट्सविला-१०’, ‘बिग बॉस ओटीटी-०१’, एस ऑफ स्पेस-०१ अशा अनेक रिअॅलिटी शोमधूनही सहभाग घेतला आहे. तसेच कंगही चित्रपटांतूनही तिने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. नुकताच अभिनेत्रीचा विवाहसोहळा पार पडला. २० फेब्रुवारी रोजी बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकरबरोबर तिने आपली लगीनगाठ बांधली. दिव्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत राहिली.
लग्नापूर्वी अभिनेत्री गरोदर असल्याच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. लग्नाआधीच गरोदर असल्यामुळे तिने लग्न केले असे म्हटले जाऊ लागले. याबद्दल सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्सद्वारे तिच्यावर टीकाही केली होती. दिव्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी लग्नात दिव्याचे पोट बेबी बंपसारखे दिसत असल्याच्या अंदाज लावला होता. त्यामुळे दिव्याने लग्नात आपलं पोट झाकेल असे कपडे परिधान केले असल्याचेही अनेकांनी म्हटले होते. मात्र या साऱ्यावर अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांना चांगलीच चपराक लावली आहे.

दिव्याने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्यंगात्मक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “तू इतकी जाड का आहेस, तू इतकी पातळ का आहेस, तू इतकी काळी का आहेस, तू इतकी बुटकी का आहेस, तू इतकी उंच का आहेस? असं बोलण्यापेक्षा तू खूप सुंदर दिसतेस असं म्हणा. नेहमी फालतू बोलायची गरज नसते”.
दरम्यान, दिव्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. तिच्या या पोस्टमुळे लग्नाआधीच ती गरोदर राहिली असल्याच्या अनेक चर्चांना व ही चर्चा करणाऱ्या लोकांना अभिनेत्रीने नकळतपणे टोला लगावला आहे. त्यामुळे तिच्या गरोदरपणावरुन व तिचे पोट बेबी बंपसारखे दिसत असल्याचे म्हणणाऱ्या लोकांची बोलती यामुळे बंद झाली आहे.